दिल्लीत जंग-जंग पछाडून भाजप हरलं ; वाचा पाकिस्तानात काय प्रतिक्रिया??

नवी दिल्ली |  दिल्ली काबीज करण्यासाठी देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, आख्खं केंद्रिय मंत्रिमंडळ, योगी आदित्यनाथ यांच्यासारखे अनेक राज्यातले रोखठोक मुख्यमंत्री, विविध राज्यातले प्रमुख भाजप नेते तसंच हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची मोठी फौज दिल्लीत तळ ठोकून होती. परंतू दिल्लीकरांनी पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेऊन त्यांना प्रचंड बहुमतांनी निवडून दिलं आहे. 70 विधानसभेच्या जागांपैकी 63 जागा आपच्या नावावर दिल्लीकरांनी केल्या आहेत. भाजपच्या ध्रुवीकरणाला, ‘गोली मारो’सारख्या वक्तव्यांना, भारत-पाकिस्तान वगैरे वगैरे…. या सगळ्या मुद्द्यांना दिल्लीकरांनी केराची टोपली दाखवली. साहजिक अरविंद केजरीवाल यांच्या विजयानंतर आणि भाजपच्या पराभवानंतर पाकिस्तानी मीडिया आणि लोकांमध्ये याची जोरदार चर्चा आहे.

पाकिस्तानमधल्या अकबार एक्सप्रेस या वृत्तपत्राने मथळा लिहिलाय… ‘वादग्रस्त नागरी दुरुस्ती कायद्याने मोदींना बुडवलं, दिल्ली विधानसभा निवडणुकीत सर्वात वाईट पराभव…!’ केंद्र सरकार दिल्ली भाजपच्या दिमतीला असून देखील भाजपला फक्त 8 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. भाजपसाठी हे मानहाणीकारक आहे.

अकबार जंगने लिहिलं आहे की, ‘दिल्ली निवडणुकीत पुन्हा एकदा आम आदमी पक्षाने जोर धरला आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाला पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागले. मोदींचा अहंकार दिल्लीकरांनी उतरवला आहे. ज्या दिल्लीत 8 ते 10 महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत भाजपने 7 जागा जिंकल्या त्या ठिकाणी भाजपला एवढा मोठा पराभव स्विकारावा लागतोय.

जियो न्यूजने मथळा लिहिलाय… अरविंद केजरीवालांकडून भाजपला धुव्वा.. दिल्लीची निवडणूक मोदींपुढे मोठं आव्हान होतं मात्र मोदींना ते आव्हान पेलवलं नाही!

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवारांच्या होमग्राउंडवर रंगणार पहिलाच रणजी सामना!

-थोरात, भुजबळांच्या बंगल्यांवर डागडुजीसाठी होणार सर्वाधिक खर्च!

-मलायकाशी लग्न करण्यास अर्जुन करतोय टाळाटाळ?

-“काँग्रेसनं अरविंद केजरीवाल यांचं नेतृत्व स्वीकारावं”

-भाजपच्या अडचणी आता वाढणार कारण अरविंद केजरीवाल उचलणार ‘हे’ पाऊल