“आमचं हिंदुत्व कायम असून, आम्ही सरड्यासारखे रंग बदलत नाही”

मुंबई | महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. शिवसेनेकडून अयोध्येत जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, काँग्रेसचे नेते देखील अयोध्येत दाखल झाले आहेत.

आमचं हिंदुत्व कायम असून, आम्ही सरड्यासारखे रंग बदलत नाही. राममंदिरासाठी शिवसेनेची भूमिका कायम महत्वाची राहिली आहे, असं म्हणत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते अयोध्येत बोलत होते.

सरकार स्थापन होण्यापूर्वीही उद्धव ठाकरे अयोध्येत आले होते. आज मुख्यमंत्री म्हणून येत आहेत, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, श्री राम नगरी अयोध्येत उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी फैजाबाद आणि अयोध्येत सर्वत्र बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे अयोध्येत भगवं वातावरण पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-“कलयुगात महाभारत आणि रामायण एकत्र बघायचा योग आला”

-ज्येष्ठ पत्रकार मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर काळाच्या पडद्याआड

-एकतर हे माध्यम सोडून द्यावं नाहीतर….; जितेंद्र जोशींना संताप अनावर

-उद्धव ठाकरेंसोबत काँग्रेस नेतेही पोहोचले आयोध्येत

-पोरीनं आई-बापाचं पांग फेडलं; पहिल्याच प्रयत्नात बनली पीएसआय!