तुरुंगातून सुटणं नाही सोपं; पूर्ण कराव्या लागतात या 15 स्टेप्स, आर्यन असा सुटला

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तब्बल 27 दिवस तुरुंगात घालवल्यानंतर अखेर आपल्या घरी पोहोचला आहे. आर्यनची आज सकाळी 11 वाजता तुरुंगातून सुटका करण्यात आली. ज्या क्षणाची तो खूप दिवसांपासून वाट पाहत होता अखेर तो क्षण आज उजाडला आणि त्याची सुटका झाली. शुक्रवारी तो त्याच्या बॅरेकमध्ये पूर्ण तयारी करून बसला होता, मात्र त्याच्या सुटकेची कागदपत्रे वेळेवर पोहोचू शकली नव्हती त्यामुळे त्याला आणखी एक रात्र तुरुंगातच काढावी लागली.

तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी म्हणजेच कोणत्याही कैद्याला जामिनावर सोडण्याची प्रक्रिया खूप मोठी असते. जेल मॅन्युअलनुसार त्याला 15 स्टेप्स पूर्ण कराव्या लागतात. जामीन मिळण्यापासून ते तुरुंगातून बाहेर येण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया या 15 मुद्द्यांमध्ये समजावून घेता येईल. जाणून घेऊया ही प्रक्रिया नेमकी कशी असते.

जामिनावर सुटण्याची ही आहे प्रक्रिया वाचा-

जामिनाचा आदेश कारागृह कार्यालयात पोहोचल्यानंतर लाऊड ​​स्पीकरवर दोनदा कैद्याचे नाव पुकारले जाते.

तुरुंगातील कर्मचारी आज जामिनावर सुटणा-या लोकांचे कागद घेऊन बॅरेक-बॅरेकमध्ये फिरतो. यावर सर्व कैद्यांचे फोटो आणि तपशील लिहिलेला असतो.
त्यानंतर अर्धा तास सर्वांना दिला जातो आणि नंतर कारागृह अधीक्षक कार्यालयाजवळील एका मोठ्या हॉलमध्ये सर्वांना एकत्र बोलावले जाते.

येथे पीएसआय दर्जाचा अधिकारी येतो आणि सर्व कैद्यांची कागदपत्र बघितली जातात. तोच अधिकारी सर्व कैद्यांना त्यांची नावे विचारतो. खात्री झाल्यानंतर, सर्व कैद्यांना जेल कार्यालयाजवळील दुसर्‍या हॉलमध्ये नेले जाते, जेथे 5 काउंटर आहेत.

येथे प्रत्येक कैद्याला बोलावून त्याच्यासमोर जामीनपत्र तपासले जाते. या दरम्यान सर्व कैदी जमिनीवर बसतात. एका काउंटरवर कैद्याचे फिंगर प्रिंट, एका काउंटरवर आय स्कॅन आणि मग शॉट (कैद्याचा फोटो) एका काउंटरवर घेतला जातो.

चौथ्या काउंटरवर, कैद्याच्या वैयक्तिक तपशीलांची पडताळणी केली जाते आणि त्याचे संपूर्ण रेकॉर्ड तपासले जाते. यानंतर पाचव्या काउंटरवर समुपदेशक असतो. कोणत्याही कैद्याला वाटल्यास तो त्याच्याशी बोलू शकतो.

औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर सर्व कैद्यांना एका रांगेत तुरुंग अधीक्षकांकडे नेले जाते. कारागृह अधीक्षक सर्व जामीनपात्र कैद्यांशी संवाद साधतात. यानंतर सर्व कैद्यांना सुटकेच्या आदेशावर स्वाक्षरी करण्यास सांगितले जाते. सुटकेचा हा आदेश तुरुंगाच्या कारकुनाकडे जातो.

कारागृह लिपिक जामीन आदेशाची पुष्टी करतो. लिपिकाच्या सुटकेच्या आदेशाला मंजुरी दिल्यानंतर, जेलर रिलीज ऑर्डरची पुन्हा पडताळणी करतो आणि नंतर त्यात आपले रिमार्क लिहितो.

प्रत्येक कैद्याला जाण्यापूर्वी त्याचे सामान परत केले जाते आणि जर कैद्याने कारागृहाच्या ग्रंथालयातून जारी केलेले पुस्तक घेतले असेल तर ते त्याला परत करावे लागेल आणि एनओसी रजिस्टरवर स्वाक्षरी करावी लागेल.

शेवटी कारागृहाच्या गेटवर असलेल्या रजिस्टरवर जामिनावर सुटणाऱ्या कैद्यांच्या सह्या घेतल्या जातात. यानंतर सर्व कैद्यांना कारागृहाच्या छोट्या गेटमधून एका रांगेत बाहेर काढले जाते.

आर्यनच्या खानची कारागृहातून सुटका कशी झाली वाचा-

5:30 AM: तुरुंगातील जामीन पेटी उघडली आणि आर्यनच्या सुटकेचा आदेश काढला गेला.

6:36 AM: सुटकेचा आदेश कारागृह कार्यालयात पोहोचला.

7:00 AM: तुरुंग अधिकाऱ्यांना अधिकृतपणे आदेश प्राप्त झाला.

8:00 AM: आर्यन खानच्या रिलीजची प्रक्रिया सुरू.

8:15 AM: शाहरुख खान मन्नतहून आर्थर रोड तुरुंगाच्या दिशेने रवाना झाला.

8:55 AM: तुरुंग अधीक्षक नितीन वायचळ यांनी सुटकेचा आदेश मिळाल्याची पुष्टी केली.

9:30 AM: लाऊड ​​स्पीकरवर आर्यनचे नाव पुकारण्यात आले.

10:30 AM: शाहरुख खानचा बॉडी गार्ड रवी जेलच्या गेटवर पोहोचला.

11:01 AM: आर्यन खान आर्थर रोड जेलमधून बाहेर पडला.