…तर अमित शहा हे भारताचे हिटलर ठरतील- ओवैसी

नवी दिल्ली | नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर झालं असून त्यावर  सर्व सदस्य जोरदार चर्चा करत आहेत. यावरून एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संमत झालं तर अमित शहा हे भारताचे हिटलर ठरतील. हा नवा इतिहास होण्यापासून अमित शहा यांना वाचवा. त्यांना हिटलर होण्यापासून वाचवा. या देशाला वाचवा, असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.

धर्मनिरपेक्षता हा आपल्या देशाचा मूळ गाभा आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मूलभूत अधिकारांचंच उल्लंघन करणारं आहे. या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे भारताचं इस्रायल होईल. गृहमंत्री अमित शहा यांची तुलना हिटलरशी केली जाईल, असा घणाघात ओवैसी यांनी अमित शहांवर केला आहे.

दरम्यान, काँग्रेससह अनेक विरोधकांनी या विधेयकाला विरोध केला आहे. हे विधेयक अल्पसंख्याकांविरोधात नाही, असं दावा शाह यांनी सभागृहात केला आहे.

महत्वाच्या बातम्या-