रिझर्व्ह बँकेकडून नुसतेच पैसे घेत सुटलात… हे सरकार दिवाळखोरीत आहे काय??- ओवैसी

नवी दिल्ली |  केंद्र सरकार रिझव्‍‌र्ह बँकेकडून हंगामी लाभांशापोटी सुमारे ३० हजार कोटी रुपयांची मागणी करण्याची चर्चा सुरू आहे. सरकारकडून सुरू असलेल्या हालचालींवरून एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

या नव्या मागणीसह मोदी सरकारने मार्चपासून आतापर्यंत रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाकडून 2 लाख 34 हजार कोटी रूपये घेतले आहे. हे सरकार दिवाळखोरीत आहे का? आतापर्यंत कोणत्याही सरकारने एका वर्षात 50 हजार कोटी रूपये रिर्झव्ह बँकेकडून घेतलेले नाही, अशा शब्दांत ओवैसी यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे.

महसुली उत्पन्नातील असमाधानकारक वाढ, तसेच चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीतील ५ टक्क्यांवर गेलेला विकासदर वाढविण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे सरकारी तिजोरीवर ताण पडत आहे. त्यात कंपनी करांतून भरीव सवलतींची घोषणा काही दिवसांपूर्वी केंद्राकडून करण्यात आली. पण यासाठी उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार असल्यामुळे आणि जीएसटी संकलनात सातत्य नसल्यामुळे तूट भरून काढणार कशी अशा प्रश्न सरकारसमोर आहे.

देशातील प्रत्येक क्षेत्र तोट्याची झळ सोसत आहे. देशाच्या संरक्षणाचे काम करणाऱ्या सीआरपीएफ जवानांच्या रेशनसाठीही सरकारकडे पैसे नाहीत. जीएसटीद्वारे होणाऱ्या कर संकलनातील राज्याचा हिस्सा केंद्राकडून न मिळाल्याने एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत, असंही ओवैसी म्हणाले.

दरम्यान, 2019-2020 या आर्थिक वर्षांतील वित्तीय तूट जीडीपीच्या साडेतीन टक्क्यांपर्यंत राखण्यासाठी वर्षांच्या अखेरीस सरकार रिझव्‍‌र्ह बँकेकडून हंगामी लाभांशापोटी सुमारे ३० हजार कोटी रुपयांची मागणी करण्याची चिन्हे आहेत.

महत्वाच्या बातम्या-