“राजभवानातील नाचणारे मोर हे डसणाऱ्या सापापेक्षा बरे”

मुंबई | राजभवनाच्या (rajbhavan) दरबार हॉलच्या लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे( Uddhav Thackeray) यांनी जोरदार टोलेबाजी केली. राजभवनात थुई थुई नाचणारे मोर येतात. तसेच विषारी नागही येतात. अनेकदा आपण त्यांचे फोटो पाहत असतो, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोले लगावले.

तीन बाजूंनी समुद्राने वेढलेले राजभवन हे देशातील सर्वोत्तम राजभवन आहे. बाजूलाच गर्द हिरवी झाडे आहेत. अशी वास्तू अन्यत्र शोधूनही सापडणार नाही. या राजभवनात आपण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत माजी राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंह यांना तसेच अनेक राज्यपालांना भेटलो होतो. आता राजभवनातील हा नवा दरबार हॉल सशक्त लोकशाहीतील घडामोडी पाहण्यासाठी सुसज्ज झाला आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं.

राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांच्या हस्ते राजभवनातील नवीन दरबार हॉलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्रीमती सविता कोविन्द, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर, वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोलेही लगावले. याला आता भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

राजभवनातील हवा थंड असेल तर चांगलंच आहे. थंड हवेच्या स्थानाच्या विरोधात आगपाखड करणाऱ्यांनी गरम करु नये. सार्वजनिक वायू प्रदुषणाचे कार्यक्रम सामनातून करु नयेत, असं ते म्हणालेत.

राजभवनात नाचणारे मोर पाहणं बरं आहे, डसणाऱ्या सापांपेक्षा हे मोर बरेच बरे आहेत, असं म्हणत आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, आपलं राजभवन कदाचित हे देशातील सर्वोत्तम राजभवन असेल. या वास्तुला 50 एकरची जागा लाभली आहे. एका बाजूला अथांग समुद्र आहे. दुसऱ्या बाजूला गर्द हिरवीगार झाडी आहेत. या परिसरातील हवा थंड असते. राजकीय हवा कशी असू द्या. पण मलबारहिलची हवा चांगली असते, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

काळजी घ्या! कोरोनामुक्त झालेल्यांना ‘या’ गंभीर आजाराचा धोका; अत्यंत धक्कादायक माहिती समोर 

दहावी, बारावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; लवकर अर्ज करा 

‘प्रॉमिस डे’ला जयंत पाटलांनी शरद पवारांना दिलं ‘प्रॉमिस’, म्हणाले…

IPL Auction 2022 : लिलावात दिल्ली कॅपिटल्स लावणार ‘या’ 10 खेळाडूंवर बोली 

देशाच्या संरक्षणमंत्र्यांनाही आवरेना ‘पुष्पा’चा मोह, म्हणाले “फ्लावर भी और फायर भी”