“शिवसेनेचा मराठी मुद्दाही गेला आणि हिंदुत्वाशी संबंधही राहिलेला नाही”

मुंबई | राज्यात सध्या अनेक मुद्द्यांनी राजकीय वातावरण तापलं आहे. दिवसेंदिवस विविध मुद्द्यावरुन राजकीय गदारोळ सुरुच आहे.

भाजप आणि शिवसेना वाद महाराष्ट्राला काही नवा नाही. अशातच आता भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्यातील पोलीस हनुमान भक्तांना, हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना पकडण्यासाठी निघालं आहे. दुसरीकडे केंद्रीय यंत्रणा दाऊदच्या हस्तकांना पकडायला निघालं आहे. हा फरक राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी सरकारच्या कामकाजातील आहे, असा टोला आशिष शेलारांनी लगावला आहे.

आडनावावरुन कारवाया केल्या जात आहेत असा आरोप यावेळी आशिष शेलार यांनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा वातावरण जोरदार तापलं आहे.

बेहरामपाडा दिसत नाही आणि शाहीन बागवर कारवाई केल्यावर आरडाओरड करता. राणे दिसतात पण शेख, पठाण दिसत नाहीत. ते अनिधिकृत नाहीत असं म्हणायचं आहे का?, असा हल्लाबोलही शेलारांनी केला आहे.

शिवसेनेचा मराठी मुद्दाही गेला आहे आणि हिंदुत्वाशी संबंधही राहिलेला नाही, अशी जहरी टीका आशिष शेलारांनी केली आहे.

हिंदुत्वाच्या मुद्यावरुन आता भाजप आणि शिवसेनेत पुन्हा वाद सुरु झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  Gold-Silver Rate| सोने-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचे ताजे दर

  नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार?, समोर आली महत्त्वाची माहिती

  ‘लवकरच मोठी नावं उघड होणार’; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

  चक्रीवादळाचा पुन्हा धोका; ‘या’ तीन राज्यांना अलर्ट जारी

  “मी मुंबईचा मराठी माणूस आहे, हे शहर आमच्या बापाचं”