अंगाशी आल्यावर आम्हाला कसला इतिहास शिकवताय? आशिष शेलारांची संजय राऊतांवर टीका

मुंबई | राजभवनाच्या भिंतीवर डोकं फोडलं तरी 27 मे नंतरही सरकार हेच राहील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील. हे वैभल्यग्रस्त विरोधी पक्षाने लक्षात ठेवावं, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. याला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलंय .

कोरोनाच्या या युद्धात राज्यपालांवर अनाठायी राजकीय टीका करणं पत्रपंडितांच्या अंगाशी आलं. पक्षाच्या नेत्यांना राजभवनावर धावाधाव करावी लागली. म्हणून पत्रपंडितांनी आज रोखठोक मध्ये टिक टॉक करुन आता स्वतःच्या अंगाशी आलेलं झटकण्याची केविलवाणी धडपड केली, असं ट्विट करत शेलारांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.

अंगाशी आल्यावर आम्हाला कसला इतिहास शिकवताय? कृष्णकुंजमुळे मातोश्रीवर पोहोचले… मातोश्रीमुळे संसदेत पोहोचले. पण पत्रपंडित हो, इतिहास विचारु शकतो तुम्हाला…महोदय, का या सगळ्यांना विसरुन तुम्ही नेहमीच सिल्वरओक कडे झुकले?, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

दरम्यान, एकीकडे कोरोना व्हायरसने थैमान घातलं असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-कोरोना रुग्ण शोधण्यासाठी आता पल्स ऑक्सिमीटर, असं होणार निदान?

-मुख्यमंत्र्यांनी मानले नितीन गडकरींचे आभार, म्हणाले…

-कोरोनामुळे मुंबई पोलीस दलातील आणखी एका हवालदाराचा मृत्यू

-गुणाकारात वाढणाऱ्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यात आपण यशस्वी- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

-पुण्यातील या महत्त्वाच्या उड्डाणपुलाबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय