“पुढील महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देता येतील की नाही याबाबत साशंकता”

नांदेड | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यात शासकीय कर्मचाऱ्यांना पगार देता येईल का नाही? हे सांगणं कठीण आहे. कोरोना नसलेल्या 9 जिल्ह्यांत शिथिलता देता येईल का, यावर विचार सुरु आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक आहे. पण, आता आर्थिक संकट देखील येणार आहे. सर्व काही बंद असल्याने व्यापारी, कारखानदार पगार कसे देणार हा प्रश्न आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे पुढील महिन्याचे सरकारी कर्मचाऱ्यांचे देखील पगार देता येतील का नाही, याबाबत मंत्री अशोक चव्हाण यांनी शंका व्यक्त केली आहे.

लॉकडाऊन आणि त्यानंतर येणाऱ्या आर्थिक संकटाचा अभ्यास करण्यासाठी उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीगटाची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती यावर अभ्यास करणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील 9 जिल्हे हे अजूनही कोरोनामुक्त जिल्हे आहेत, तर काही जिल्ह्यांत कोरोनारुग्णांची संख्या ही अत्यंत कमी आहे. त्यामुळे अशा जिल्ह्यांमध्ये व्यवहार सुरु करायचं का याचा विचार करत असल्याचंही अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

-म्हणून… आपला देश या जगातील महासत्ता बनेल- उध्दव ठाकरे

-हा व्हायरस विचित्र आहे त्यामुळे तुम्ही शिस्त पाळा, हे युद्ध आपण जिंकणारच- मुख्यमंत्री

-कोरोनाचा धसका, कोकणातील मुलींचा मुंबई आणि पुण्यातील मुलांसोबत लग्न करण्यास नकार

-संकटात महाराष्ट्र हा देशाला नव्हे तर जगाला दिशा दाखवतो- उद्धव ठाकरे

-राज्यातील लॉकडाऊन कायम; उद्धव ठाकरेंची मोठी घोेषणा