मुस्लिमांच्या आग्रहामुळे काँग्रेस शिवसेनेसोबत गेली; अशोक चव्हाण यांचं मोठं वक्तव्य

नांदेड |  हिंदुत्ववादी असलेल्या शिवसेनेशी काँग्रेसने हातमिळवणी करत महाराष्ट्रात सत्तास्थापन केली. मुस्लिम समाजाच्या आग्रहामुळे आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेसोबत गेली, असं मोठं वक्तव्य काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

नांदेडमध्ये सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी यांविरोधात मुस्लिम समाजाने आंदोलन केलं. यावेळी छोटेखानी सभा पार पडली. या आंदोलनात मंत्री अशोक चव्हाण सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्रात पाठीमागच्या 5 वर्षात भाजपमुळे जे काही नुकसान झालंय ते आता महाराष्ट्राच्या पुन्हा वाट्याला येऊ नये यामुळे काँग्रेस पक्षाने शिवसेनेसोबत जाऊन सत्तास्थापन करण्याचा निर्णय घेतला, असं ते म्हणाले.

भाजप हा आमचा प्रमुख विरोधी आहे, असं तमाम मुस्लिम बांधवांनी काँग्रेसला सांगितलं. आणि भाजपला दूर ठेवण्यासाठी तुम्ही सत्तेत सहभागी व्हायला हवं, असं त्यांनी बजावलं आणि मग काँग्रेसने सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला, असं त्यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या-

“मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेनं जे केलं ते खुलेआम केलं”

काय करावं आता… वर्गशिक्षिकाच आठवीच्या मुलासोबत गेली घरातून पळून!!!

-“मंत्रालयातील गोड अळूच फदफद आवडतं की ठेचा, भाकरी…निर्णय तुमचा”

-शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा तर तानाजींच्या चेहऱ्यावर शहांचा फोटो; पहा व्हिडीओ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजय देवगण मंगळवारी ‘तानाजी’ चित्रपट पाहण्यासाठी येणार एकत्र