…तर सरकारमधून बाहेर पडू- अशोक चव्हाण

नांदेड | संविधानाच्या चौकटीतून राहून हे सरकार चाललं पाहिजेे. तसेच घटनाबाह्य काम करणार नाही हे शिवसेनेकडून लिहून घेतलंय, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते नांदेडमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

संविधानाच्या चौकटीतून राहून हे सरकार न चालल्यास सरकारमधून बाहेर पडायचं, अशा कडक सूचना सोनिया गांधी यांनी दिल्या आहेत, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.

आमचं क्षेत्र असो वा सिनेमा, नाट्य क्षेत्र सारखंच असतं. आमचा सिनेमा चालला तर चालतो किंवा पडला तर पडतो सांगता येत नाही. सुदैवाने आमचा सिनेमा बरा चालला आहे, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आम्ही तीन पक्ष एकत्र येऊ असं वाटलं नव्हतं. पण आम्ही एकत्र आलो. हल्ली मल्टिस्टारचा जमाना आहे. तीन हिरो पाहिजे. त्यामुळे आमचं सरकार आलं, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-राष्ट्रवादीच्या ‘त्या’ पोस्टवर नेटकऱ्यांनी उठवली टीकेची प्रचंड झोड

-मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर पंकजा मुंडेचं लाक्षणिक उपोषण

-…अन् शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसचे नेते एकाच रथात

-नाथाभाऊंनी मला मुलगा मानलं असतं तर ही वेळ आली नसती- गुलाबराव पाटील

-देश आधी मनसे, अन् आता काँग्रेस करतंय अदनान सामीच्या ‘पद्मश्री’ला विरोध