फक्त महाराजांनी नाही तर त्यांच्या समर्थकांनी देखील माफी मागितली पाहिजे- असीम सरोदे

पुणे |  इंदोरीकर महाराजांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दिलगीरी व्यक्त केली आहे. माझ्या अभ्यासानुसार मी जे काही बोललो त्याचा मीडियाने विपर्यास केला आहे. तरीही माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं महाराजांनी म्हटलं आहे. परंतू अ‌ॅड. असीम सरोदे यांनी फक्त महाराजांनी नाही तर त्यांच्या समर्थकांनी देखील माफी मागितली पाहिजे, असं म्हटलं आहे.

कायद्याचा धाक निर्माण झाला, गुन्हा दाखल होईल, अटक होईल असे वाटले म्हणून त्यांनी माफी मागितली असे काही जण म्हणत असले तरी इंदुरीकरांनी माफी मागितली हे महत्वाचे आहे. आता इंदोरीकर महाराजांचे फेसबुक व इतरत्रही समर्थन करणाऱ्या सगळ्यांनी सुद्धा माफी मागावी, असं सरोदे यांनी म्हटलं आहे.

कायद्याचा उद्देश दरवेळी कुणाला तरी अटक व्हावी, शिक्षा व्हावी असा नसला पाहिजे. मनापासून वाईट वाटणे आणि चूक करणाऱ्याने माफी मागणे हा कायद्याचा एक सकारात्मक उद्देश असतो. गुन्ह्याचे स्वरूप बघता इंदुरीकर महाराज यांच्याकडून नीट सगळे मुद्दे लेखी घेऊन मग त्यांना माफ करावे असे मला वाटतं, असंही सरोदे म्हणाले आहेत.

यानंतर महाराजांनी असं कधीच बोलणार नाही असं लिहून दिलं का हे पाहणं गरजेचं आहे. मनापासून प्रायश्चित झाले असेल तर माफ करणे ही भारतीय परंपरा आहे, असंही सरोदे म्हणाले आहेत.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-इंदोरीकरांना वाचवणाऱ्या राजकीय नेत्यांना तुम्हाला मंत्रालयात कोंडून घेईन- तृप्ती देसाई

-…. तर इंदोरीकर महाराजांच्या तोंडाला काळं फासू- तृप्ती देसाई

-छत्रपती शिवरायांवर मुस्लीम मावळ्यांनी केलेला टीकटॉक व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल!

-कीर्तन म्हणजे करमणूक समजलात काय?; तुकाबांचे वंशज डॉ. सदानंद मोरे संतापले

-मी बोलवतीय, तुमच्यात हिंमत असेत तर…; तृप्ती देसाईंच इंदोरीकरांना आव्हान