राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | कोणलातरी अटक होणं, कोणालातरी गुन्ह्यात अडकवणं किंवा अडकलं जाणं, या कारणावरून राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकत नाही, असं कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.

जेव्हा संविधानाने आखुन दिलेल्या प्रक्रियेनुसार राज्य सरकार चालण्यास अक्षम असते आणि राज्य सरकार (State government) संविधानाच्या (Constitution) प्रक्रियेनुसार चालु शकत नाही. कायद्याचे राज्य म्हणून अस्तित्वात येऊ शकत नाही, अशा वेळी 354 घटनेतील तरतुदीनुसार राष्ट्रपटी राजवट लावली जाऊ शकते, असं ते म्हणालेत.

सध्या नवाब मलिका ईडीच्या कोठडीत आहेत. यावरून भाजपाने आक्रमक पवित्रा घेतलाय. त्यांनी केलेल्या अशाप्रकारच्या मागण्या कायद्याला धरून आहेत का, असा सवाल आता विचारला जात आहे. सरोदे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता नसल्याचं सांगितलं.

राष्ट्रपती राजवट म्हणजे नेमकं काय?

राष्ट्रपती राजवट म्हणजे नेमकं काय? ती कधी लागू होते याविषयी अडव्होकेट असीम सरोदे यांनी माहिती दिली. घटनात्मक शासनयंत्रणा अस्तित्वात न येणे, घटनात्मक शासनव्यवस्था नीट चालत नसेल, सरकारला बहुमत नसेल, किंवा सरकारनं बहुमत गमावलं असेल, राज्याने केंद्राचे काही महत्त्वाचे निर्णय अंमलात आणण्यास नकार दिल्यास राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते.

या काळापुरती विधानसभा स्थगित होते. ही राष्ट्रपती राजवट 2 महिन्यांच्या काळापुरती राहू शकते. त्यानंतर राजवटीचा कालावधी वाढवायचा असेल तर केंद्र सरकार संसदेत तसा ठराव मांडतं. हा ठराव मंजूर झाल्यास राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवला जाऊ शकतो.

राष्ट्रपती राजवटीत राज्याचे सर्व अधिकार केंद्राचा प्रतिनिधी म्हणून राज्यपालांकडे एकवटतात. या कालावधीत राज्यपाल हे राज्याचे मुख्य सचिव आणि काही सनदी अधिकाऱ्यांच्या मदतीने राज्याचा कारभार पहातात. या कालावधीत निर्णय घेण्याचे अधिकार संसदेकडे जातात.

राज्यपालांच्या सूचनेवरून केंद्र सरकार याबाबतचे बरेच निर्णय घेऊ शकतं, म्हणजेच पूर्ण शासन व्यवस्था ही राज्यपालांच्या मार्फत चालते.
आधीच्या मंजूर झालेल्या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या कारणांसाठी – खर्चांसाठी मार्चपर्यंत तरतूद करण्यात आलेली असते. त्यामुळे ते खर्च केले जाऊ शकतात, पण नवीन कोणतेही खर्च करण्याचा अधिकार राज्यपालांना नसतो.

महत्वाच्या बातम्या- 

अमेरिकेकडून मदतीची अपेक्षा करणाऱ्या युक्रेनला जो बायडन यांचा धक्का; केलं ‘हे’ मोठं वक्तव्य

नरेंद्र मोदींचा व्लादिमीर पुतिन यांना फोन, दिला ‘हा’ महत्वाचा सल्ला  

मोठी बातमी! चंद्रकांत पाटलांच्या नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

कॉमेडियन ते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष; पुतिन यांना भिडणारा पठ्ठ्या सैन्यासह स्वत: रणांगणात

शिवसैनिकाची मास्कमुळे झाली मोठी फजिती; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पाहा व्हिडीओ