“इकडं चिमटे काढ, तिकडं चिमटे काढ, म्हटलं अरे काय चाललंय काय”

बारामती | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार माईकसमोर आले की सभागृहात एकच हशा पिकल्याचं पहायला मिळतं. अनेकदा त्यांनी आपल्या मंचावरून टोलेबाजी करत कार्यक्रमात रंगत आणतात.

बारामतीतील इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन आणि विज्ञान संशोधन केंद्राचा उद्धाटन कार्यक्रम आज पार पडला. त्यावेळी अजित पवारांची चांगलीच टोलेबाजी केल्याचं पहायला मिळालं.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. त्यावेळी अजित पवारांनी आपले बंधु राजेंद्र पवार यांना खोचक टोला लगावला आहे. राजेंद्र पवार यांनी कार्यक्रमात बोलताना ठाकरे सरकारच्या कामातील उणिवा सांगितल्या होत्या.

राजेंद्र पवार यांच्या भाषणानंतर अजित पवार ज्यावेळी बोलण्यास उभा राहिले त्यावेळी त्यांनी राजेंद्र पवारांना टोले लगावले. मी आमच्या बंधूंचं भाषण ऐकत होतो. आज दिवाळीचा सण आहे आणि आज गाडी इतकी जोरात होती की मला काही कळलंच नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत.

समोर शरद पवार बसलेत, सुप्रिया बसलीये, मी बसलोय पण हा बाबा थांबायला तयार नव्हता. मी म्हटलं एखाद्याकडून काम करून घेयचं असेल तर उभं आडवं करून काम कसं होणार, असा मिश्किल टोला देखील अजित पवारांनी लगावला.

एखादं काम गोड बोलून बोलून, गोंजारत गोंजारत करून घेयचं असतं. एखादा चिमटा काढून घेयचं असतंय, पण सारखं इकडं चिमटे काढ तिकडं चिमटे काढ, म्हटलं झालंय तरी काय आज, असं अजित पवार म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

जाऊदे जास्त बोलत नाही. दिवाळीचा सण आहे आणि मोठे बंधू पडतात, असंही अजित पवार म्हणाले. बंधूराज जी नोंद घेयची ती घेतली आहे, असं म्हणत अजित पवारांनी हात जोडले.

एवढंच सांगतो, मुख्यमंत्री जेवढं शक्य असेल तेवढं सकारात्मक भूमिका घेत असतात. आम्ही सर्वजण निश्चित प्रयत्न करू, असंही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.

अजित पवार आणि राजेंद्र पवारांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टोलेबाजी केली. अजितदादा तुम्ही दोघं ठरवा काय काय करायचंय ते आणि मला सांगा. काय काय बाकी आहे ते मला सांगा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, त्यांनी आडकाठी आणली की मला सांगा बाकीची काम मी शरद पवारांकडे जाऊन करून घेतो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

पाहा व्हिडीओ-

महत्त्वाच्या बातम्या

“अनिल देशमुखांवरील कारवाई योग्यच, आता अजित पवारांनी कारवाईला सामोरं जावं”

“ठाकरे सरकारच्या मदतीनंच परमबीर सिंग गायब”

“तुमच्याही फायली तयार आहेत, 2024 नंतर भेटू”

सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना- राम कदम 

“आज टणाटणा उड्या मारणाऱ्यांना बाथरूममध्ये तोंड लपवून बसावं लागेल”