“शरद पवारांना उशिरा कंठ फूटला, त्यांचे आणि राऊतांचे संबंध म्हणजे…”, अतुल भातखळकरांची पवारांवर टीका

मुंबई | शरद पवार (Sharad Pawar) सध्या राजधानीत आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत संवाद साधला. त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकार आणि भाजपच्या (BJP) कामकाजावर टीका केली.

तसेच यावेळी त्यांनी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची पाठराखण केली. त्यांनी त्यांच्या विरोधात केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत असल्याचे म्हंटले.

संजय राऊत हे भाजपच्या विरोधात लिहतात आणि बोलतात त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवायांच्या माध्यमातून देशात सत्तेचा गैरवापर केला जात आहे.

तसेच जो नेता आणि पक्ष भाजपच्या विरोधात बोलतो आणि लिहितो, त्यांच्यावर कारवाई करण्याचा भाजपचा डाव आहे. त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवारांच्या या टीकेवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या मतातून शरद पवारांना लक्ष केले आहे. त्यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलताना आपले मत व्यक्त केले आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांना अटक करुन आता महिना झाला आहे. आणि शरद पवारांना आता महिन्याभराने कंठ फूटला आहे. असे म्हणत त्यांनी शरद पवारांच्या भाजपवरील टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

शरद पवारांनी केलेल्या भाजपवरील टीकेवर भातकळकरांना विचारले असता, ते म्हणाले, त्यांना न्यायालय, न्यायालयाची प्रक्रिया, न्यायालयाने त्यांना जामिन का नाकारला? याचे भान आहे का नाही?

तसेच ईडीने (Enforcement Directorate) न्यायालयात संजय राऊतांच्या विरोधात सादर केलेले पुरावे तसेच त्यांच्यावरील आरोप यांचे शरद पवारांना काही भान आहे का? असे अतुल भातखळकरांनी विचारले.

शरद पवारांना संजय राऊत यांचे समर्थन करण्यापलीकडे काही मार्ग नाही. कारण पवार आणि राऊत यांचे संबंध शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाला सांभाळून घेऊ आणि दोघे मिळून खाऊ, अशा प्रकारचे आहेत, असे भातखळकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

एकनाथ शिंदेंनी फडणवीसांच्या मदतीने केली अजित पवारांवर कविता; वाचा सविस्तर कविता

“राज ठाकरे भाजपची तळी उचलतात आणि ते त्यांचे…” अंबादास दानवेंची मोठी टीका

‘आगामी लोकसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल विरुद्ध नरेंद्र मोदी असा संघर्ष असेल’

देवेंद्र फडणवीसांबाबत संभाजीराजेंचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

दीपक केसरकरांची आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेवर टीका; म्हणाले, जे हिटलरने केेले…