औरंगाबादेतील 7 वर्षीय चिमुरडीची कोरोनावर मात; कोरोनाचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह

औरंगाबाद | औरंगाबादमधील एका सात वर्षीय चिमुरडीने कोरोना विरुद्ध यशस्वी लढा दिला आहे. एका खाजगी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या सात वर्षाच्या चिमुरडीचे कोरोनाचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

औरंगाबादमध्ये एका सात वर्षीय चिमुरडीने कोरोना विरोधातील लढा यशस्वीरित्या दिला आहे. या चिमुरडीचा रिपोर्ट सात दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या मुलीवर धूत रुग्णालयात उपचार सुरु होते. यानंतर 7 दिवसानंतर या मुलीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

रुग्णालयात याआधी उपचार घेत असलेली एका 59 वर्षीय महिलाही कोरोनामुक्त झाली होती. यानंतर आता सात वर्षीय मुलीने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

दरम्यान, कल्याणमध्ये एका सहा महिन्याच्या बाळाने कोरोनावर मात केली होती. कोरोनाला हरवून जेव्हा हे बाळ परत आपल्या घरी आलं तेव्हा शेजाऱ्यांनी त्याचं जंगी स्वागत केलं.

महत्वाच्या बातम्या –

-जयंत पाटलांवरील टीकेला विश्वजीत कदमांचं; चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

-“विरोधी पक्षाने पेटवलेल्या वेगळ्या चुलीवर `वाधवान’प्रकरणाचं कारस्थान शिजलं नाही”

-मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद; मुख्यमंत्री सहायता निधीत जमा झाले इतके कोटी रुपये

-‘कोरोना’बाधितांच्या मृतदेहाबाबत पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

-कोरोनाआधी आम्ही उपासमारीने मरू,आम्हाला मदत करा- इम्रान खान