मुंबई | आपल्या आणि परिवाराच्या दृष्टीने आर्थिक नियोजन खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी अनेकजण वेगवेगळी गुंतवणूक करत असतात. अशातच आता आर्थिक व्यवहार करताना काळजी घेण्याची गरज आहे.
आयकर विभाग आर्थिक गैरव्यवहारावर लक्ष ठेवण्याचं काम करते. आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने बहुतांश पेमेंटसाठी डिजिटल व्यवहारही अनिवार्य केलंय.
मर्यादापैक्षा जास्त रोखी रक्कमेवर आयकर विभागाची नोटीस येऊ शकते. बँक मुदत ठेव, बचत खाते, म्युच्युअल फंड आणि रिअल इस्टेटमध्ये मोठमोठे रोख व्यवहार होत असतात.
क्रेडिट कार्ड बिल भरताना 1 लाख रुपयांची मर्यादा ओलांडणार नाही याची काळजी ग्राहकांनी घ्यावी लागते, नाहीतर आयकर विभागाची नोटीस मिळण्याची शक्यता आहे.
बँक एफडी 10 लाख रुपयांपर्यंतच्या रोख ठेवींना परवानगी असते. 10 लाखांपैक्षा जास्त रकमेची एफडी केल्यास तुम्हाला देखील आयकर विभागाची नोटीस मिळण्याची शक्यता आहे.
ट्रेडिंग प्रॉपर्टीमध्ये व्यवहार करताना 30 लाखांपेक्षा जास्त रोखीचे व्यवहार करणं योग्य नाही. 30 लाखांपेक्षा जास्त व्यवहार केल्यास नोटीस मिळण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातमी –
“तुमची खुर्ची हलतेय, किती तरी मंत्री जेलमध्ये जाण्यासाठी वेटिंगवर”
मोठी बातमी! रशिया-युक्रेन युद्धादरम्यान एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
मोठी बातमी! रशियाविरोधात अमेरिका आक्रमक; उचललं मोठं पाऊल
“चिखल फेकणाऱ्यांचे हात किती बरबटलेले, हे सुद्धा देशाला कळायला हवं”
पुतिन यांचा अमेरिकेला झटका; घेतला हा मोठा निर्णय