रुग्णालयात ‘या’ व्यक्तीच्या आठवणीने अमिताभ बच्चन व्याकूळ; शेअर केली कविता

मुंबई | कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान सोशल मीडियावरून ते आपल्या चाहत्यांसोबत जोडलेले आहेत. रुग्णालयात असलेले अमिताभ बच्चन आता आपल्या वडिलांच्या आठवणीने व्याकूळ झाले आहेत. अमिताभ बच्चन यांनी आपले वडील हरिवंशराय बच्चन यांची एक कविता शेअर केली आहे.

कोरोनाकाळात न थकता काम करणाऱ्या कोव्हिड योध्यांना उद्देशून बच्चन यांनी ही कविता शेअर केली आहे. हरिवंशराय बच्चन यांनी जी माणसं न थकता काम करत असतात, जे लोक कोणत्याही स्वार्थाशिवाय पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्यावर ही कविता लिहिली आहे. या कवितेसोबत बच्चन यांनी एक फोटो ही शेअर केला आहे.

अमिताभ बच्चन सोशल मीडियावरून सतत आपल्या आरोग्याबाबत महिती देत आहेत. आपल्यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानत आहेत. चाहत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहेत.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी कविता शेअर करण्यापूर्वी आपल्या कुटुंबियांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये बच्चन कुटुंबीय हात उभा करून आपल्या चाहत्यांना अभिवादन करत आहे.

 

View this post on Instagram

 

Words from Babuji .. for them that work tirelessly, relentlessly , unselfishly to keep us protected : मैं हूँ उनके साथ, खड़ी जो सीधी रखते अपनी रीढ़। कभी नहीं जो तज सकते हैं
अपना न्यायोचित अधिकार,
 कभी नहीं जो सह सकते हैं
शीश नवाकर अत्याचार,
 एक अकेले हों या उनके
साथ खड़ी हो भारी भीड़;
 मैं हूँ उनके साथ, खड़ी जो सीधी रखते अपनी रीढ़। ~ HRB

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

महत्त्वाच्या बातम्या-

काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल; शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

शिवसेनेच्या ‘या’ आमदाराला कोरोनाची लागण; कार्यकर्त्यांसह अधिकाऱ्यांची झोप उडाली

बॉलिवूडवर पुन्हा एकदा पसरली शोककळा, ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन!

“मोदी सरकारच्या भ्याडपणाची आपल्याला मोठी किंमत मोजावी लागेल”

धक्कादायक! मुंबईत सुरू आहे कोरोनावरील औषधांचा काळाबाजार