अधिकारी चांगला असेल तर डोक्यावर घेऊ, पण वाईट असेल तर… – बच्चू कडू

मुंबई | आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नववर्षाच्या पहिल्या दिवशी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना आपला दणका दिला होता. मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर ते शासकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जर चांगला अधिकारी असेल तर त्याला डोक्यावर घेऊ, पण जर वाईट अधिकारी असेल तर कायदा मोडून त्याच्याकडून लोकांच्या हिताची कामं करु घेऊन, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

माझं अधिकाऱ्यांना एकच सांगणं आहे की, त्यांनी कोणतीही फाईल दाबून ठेऊ नये. कोणत्या कारणाशिवाय जर फायली दाबून ठेवल्या तर मग आम्ही आमच्या पद्धतीने कामं करु, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

दरम्यान, मला विविध खात्यांची जबाबदारी मिळाली आहे. राज्यमंत्री असो किंवा कॅबिनेट असो कामं आम्ही आमच्या पद्धतीने करु. गेली 25 वर्ष आम्ही संघर्ष केला आहे. त्यामुळे कामं कशी करून घेतली जातात हे आम्हाला योग्य पद्धतीने ठाऊक आहे, असं म्हणत बच्चू कडू यांनी यापुढेही धडाकेबाज पद्धतीनेच काम करु असं सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-