‘राज्यातील कृषी खातं झोपलं की काय?’, बच्चू कडूंचा राज्य सरकारला घरचा आहेर!

अमरावती | विदर्भात सोयाबीन पीक हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. मात्र हे पीक संकटात सापडलं आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार परिसरात सोयाबीनवर एक अज्ञात रोग आला आहे. यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बळीराजाच्या बांधावर जात पीकाची पाहणी करत त्यानंतर कडू यांनी कृषी विभागावर निशाणा साधला.

सोयाबीन पिकवणारा शेतकरी पुर्णपणे घायाळ करून टाकलेला आहे. आधी पेरलं तर उगवलं नाही आणि आता पीक निघाल म्हणेजच हातात येत आहे तर मारूण टाकलेलं आहे. मला वाटतं कृषी खातं झोपलेलं आहे की काय?, असं म्हणत बच्चू कडू यांनी घरचा आहेर दिला आहे.

जेव्हा बियाणं बाहेर येत आणि ते प्रमाणीकरन करून बाहेर निघतं तेव्हा काही बदमाशी होते की काय?, असा प्रश्न मला पडतो. माझा महाबीजवर आरोप आहे की यांनी बाजारातील सर्वात हलक्या दर्जाचं बियाणं 2 ते 3000 हजार क्विंटल या दराने खरेदी करून 8000 क्विंटलने विकलं असल्याचं गंभीर आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.

बोगस बियाणामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पीकाचे पंचनामे करून त्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत केली जाणार असल्याचं आश्वासनंही कडू यांनी दिलं  असून अशा बोगस बियाणाच्या कंपनीचा जो कोणा मालक असेल त्याला धरून चोपलं पाहिजे त्याशिवाय ते सुधारणार नाही, अशी आक्रमक भूमिका कडू यांनी घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘कोणतं पदक जिंकू म्हणजे मला अर्जुन पुरस्कार देताल?’; खेलरत्न भेटलेल्या ‘या’ खेळाडूनं थेट क्रीडामंत्र्यांना पाठवलं पत्र

“मोदीजी… तुमच्या कौतुकाची थाप आणि देशातील नागरिकांच प्रेम हाच आमच्यासाठी सर्वोच्च सन्मान आहे”

“प्रवीण तरडेंनी काल संविधानावर गणपती बसवत केलेल्या अक्षम्य कृत्याची माफी मागितली पण…”

“चंद्रकांत पाटलांचं झालंय असं की, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून”

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआयला शोधावी लागणार ‘या’ प्रश्नांची उत्तर