मायाळू मंत्री बच्चू कडूंनी ‘राहुटी’त ऐकल्या चिमुकल्याच्या मागण्या!

अचलपूरजनतेच्या प्रश्नांप्रती कायम जागरूक असणारे आणि शेतकरी,वयोवृद्ध आणि चिमुकल्यांप्रती माया आणि जिव्हाळा असलेला नेता म्हणून आमदार बच्चू कडूंची ओळख आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये बच्चू कडू यांची वर्णी राज्यमंत्रीपदी लागली आहे. मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर त्यांनी आता ‘राज्यमंत्र्यांची राहुटी आपल्या गावात’ हा उपक्रम राबवायला सुरूवात केली आहे. असाच राहुटीतला एका चिमुकल्याचा लक्ष वेधून घेणारा व्हीडिओ बच्चू कडू यांनी ट्वीट केला आहे.

राहुटीत कायमच शेतकरी, महिला आणि विद्यार्थी आपल्या प्रश्नांसाठी आणि गाऱ्हाणं सांगण्यासाठी बच्चू कडू यांना भेटत असतात आणि ते देखील तिथल्या तिथे अधिकाऱ्यांना त्यावर सूचना करून काम लगोलग झालं पाहिजे, असं बजावत असतात. व्हीडिओत एक चिमुकला मोठ्या खुबीने बोअरवेल मशीन पाहिजे होती, असं राज्यमंत्र्यांसमोर सांगत होता आणि त्याचं म्हणणं बच्चू कडू अगदी शांततेत आणि औत्सुक्याने ऐकून घेत होते.

आदित्य मेश्राम नावाच्या मुलाने त्याच्यापरीने राज्यमंत्र्यांसमोर आपलं गाऱ्हाणं मांडलं. त्याची मागणी ऐकल्यानंतर राज्यमंत्र्यांना त्याचं फार कौतुक वाटलं. त्यांनी मायेने त्याच्या गालावरून हात फिरवत त्याची प्रेमाने विचारपूस केली. काही वेळ उपस्थितांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला.

राज्यमंत्री बच्चू कडू आता ‘राज्यमंत्र्यांची राहुटी आपल्या गावात’ हा उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून थेट मंत्रीमहोदयच लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गावात घरा-घरापर्यंत पोहचणार आहे. बच्चू कडू आमदार होते त्यावेळीही ते हा उपक्रम राबवत होते. मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतरही त्यांनी ही सेवा सुरुच ठेवली आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-“चंद्रकांतदादा, मध्यावधी निवडणूक लागली तर तुम्ही कुठून लढणार पुणे की कोल्हापूर??”

-आरोपीने जसा गुन्हा केलाय तशीच शिक्षा त्याला व्हायला हवी- रूपाली चाकणकर

-उद्धवजी, आपल्यातील भांडणं विसरून महिला सुरक्षेविषयी कठोर निर्णय घ्या- अमृता फडणवीस

-हिंगणघाटच्या राक्षसाला ‘हैदराबाद’सारखा न्याय द्या- प्रणिती शिंदे

-महात्मा गांधी काँग्रेससाठी ‘ट्रेलर’ असतील पण आमच्यासाठी ‘जीवन’- नरेंद्र मोदी