इंदुरीकर महाराजांचा मलाच पाठिंबा- बाळासाहेब थोरात यांचा दावा

अहमदनगर : प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या मंचावर दिसल्यापासून आणखी चर्चेत आले आहेत. निवृत्ती महाराज देशमुख अर्थात इंदुरीकर महाराज हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणार अशीही चर्चा रंगली, पण स्वत: इंदुरीकर महाराजांनी हे वृत्त फेटाळलं. त्यानंतर आता बाळासाहेब थोरात यांनीही प्रतिक्रिया दिली.

समाजातील चुकीच्या प्रथांवर बोट ठेवणारे इंदुरीकर महाराजांचं व्यक्तिमत्व आहे. निवडणूक लढवावी की नाही हा त्यांचा हक्क आहे, त्यावर मी बोलणार नाही, असं थोरात म्हणाले.

उलट इंदुरीकर महाराज यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं. त्यामुळे एकप्रकारे त्यांनी मला पाठिंबाच दिला आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.

125, 125 आणि 38 असा आघाडीचं जागावाटप ठरलं आहे. वेळ आल्यास आमच्या 125 जागांमधून मित्रपक्षांना जागा देण्याची आमची तयारी आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मनसेला आघाडीत घेण्याची किंवा न घेण्याची कोणतीच चर्चा नाही, असंही थोरातांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या-