पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात बत्ती गुल; हे कारण आलं समोर

पुणे | पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात सकाळपासून वीज पुरवठा खंडीत झाला आहे. याचा कारण म्हणजे वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये 5 ठिकाणी झालेलं ट्रिपिंग. पहाटे साडे चारच्या सुमारास बिघाड होण्याचं कारण होतं लाईनमध्ये ट्रिपिंग होणं.

पुणे आणि पिंपरीत पारा घसरला आहे. ढंडीचा कडाका वाढलाय. अशात अतिशय दाट धुके आणि दवं यामुळे या टॉवर लाईन मध्ये बिघाड झाल्याची शक्यता असल्याचं महापारेषणकडून सांगण्यात आलय. दोन 400 केव्ही अतिउच्च दाब उपकेंद्र बंद असल्याने पर्यायी वीज पुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ शकली नसल्याचंही स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आलं आहे.

दरम्यान महावितरणकडून याबाबतची माहिती वीज ग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारेही देण्यात येत असल्याचं सांगितलंय.

विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळं इतर अनेक सेवांवर परिणाम झाला आहे. वीज नसल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

वीज पूर्ववत होण्यास नेमका किती वेळ लागेल हे निश्चित नसल्यामुळं नागरिकांची चिंता वाढली आहे. पाणी जपून वापरून सहकार्य करावं, असं आवाहन पाणीपुरवठा विभागाचे सह अभियंते प्रवीण लडकत यांनी नागरिकांना केलं आहे.

महापारेषणचे सर्व वरिष्ठ अभियंता सध्या टॉवर लाइनमधील बिघाड शोधण्यासाठी युद्धपातळीवर पेट्रोलिंग करीत आहेत. सर्व ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत होण्यास किमान तीन ते चार तासांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती महापारेषणकडून देण्यात आली आहे.

सकाळी 11 वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होऊ शकेल. दरम्यान, या कालावधीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावं असे आवाहन महापारेषण आणि महावितरणकडून करण्यात आले आहे. तसंच पाणीही जपून वापरण्याचं आवाहन केलं जातंय.

महत्वाच्या बातम्या- 

कोरोनामुक्त झालेल्यांना ‘या’ आजाराचा धोका, अत्यंत धक्कादायक माहिती समोर 

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून लवकरच मिळणार ‘ही’ मोठी भेट! 

“लता मंगेशकर हिंदुत्ववादी आणि सावरकरवादी होत्या म्हणून…” 

“काँग्रेस कार्यकर्ते भाजप कार्यालयावर आल्यास झोडून काढू” 

तीन दिवस शाळा-काॅलेज बंद; हिजाब वादानंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय