शिवसेनेला मोठा धक्का! ‘हा’ माजी आमदार पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेणार

मुंबई | सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं अनेक आहे. अनेक नेते सातत्यानं एकेमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. तसेच येत्या काही दिवसांत अनेक बडे नेते राजकीय भूकंप आणतील, असं देखील बोललं जात आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे.

भाजपचे नाशिक पूर्वचे माजी आमदार बाळासाहेब सानप हे सोमवारी दुपारी बारा वाजता भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे शिवसेनाला मोठा धक्का बसला आहे. या पक्षांतराविषयी बाळासाहेब सानप यांनी स्वतः दिली आहे.

सोमवारी मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश होईल, अशी माहिती बाळासाहेब सानप यांनी दिली आहे. बाळासाहेब सानप यांनी आज माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे.

माध्यमांशी बोलताना बाळासाहेब सानप म्हणाले की, माझी शिवसेनेत काही नाराजी नव्हती. मात्र, मी भारतीय जनता पक्षात खुप काम केले आहे. त्यामुळे कार्यकर्ते व समर्थकांचा मी भाजपमध्ये परतावे असा खुप आग्रह होता.

तसेच संघ परिवाराचीही तशीच इच्छा होती. यामुळे शिवसेना सोडून भाजपमध्ये मी पुन्हा परतणार आहे, असं बाळासाहेब सानप यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने बाळासाहेब सानप यांचा अमेद्वारी अर्ज नाकारला होता. यामुळे सानप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत निवडणूक लढवली होती. मात्र, राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्यांचा पराभव झाला होता.

यानंतर सानप यांनी राष्ट्रवादीला देखील राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, आता पुन्हा बाळासाहेब सानप घरवापसी करत आहेत. सानप यांच्या परतण्याने समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

एका चिमुरड्यानं केलं जयंत पाटलांचं फोटोशूट आणि पाटील म्हणाले…

‘धर्म बदल नाहीतर…’; दिवंगत गायक वाजिद खानच्या पत्नीचे वाजिदवर गंभीर आरोप!

भाजप आमदार गणेश नाईक राष्ट्रवादीत परतणार? गणेश नाईक म्हणाले…

तुम्हालाही कोरोनावरील लस घ्यायची आहे का? जाणून घ्या कसं करायचं लसीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन?

सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिताच भाजप नेत्यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल!