92 नगरपरिषदांच्या निवडणुकीबाबत राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!

मुंबई | राज्य निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदांच्या आणि चार नगपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुका पुढच्या महिन्यात भर पावसात नियोजित करण्यात आलेल्या होत्या. मात्र आता या निवडणुका स्थगित करण्यात आल्यात.

निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे सर्व क्षेत्रात जाहीर करण्यात आलेली आचार संहिताही आता लागू होणार नाही. निवडणूक आयोगाकडून याबाबतचे परित्रक काढण्यात आले आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय या निवडणुका होवू नये, अशी मागणी केली जात होती. दुसरीकडे पावसाचा मुद्दा उपस्थित करत काही राजकीय पक्षांनी या निवडणुकीला पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

या निवडणुका 18 आणि 19 ऑगस्टला नियोजित होत्या. या निवडणुकींसाठी 18 ऑगस्टला मतदान होणार होतं. तर 19 ऑगस्टला मतमोजणी होणार होती.

दरम्यान, पुणे (Pune), सातारा, सांगली(Sangli), सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे (Dhule), नंदुरबार, जळगाव (jalgaon), अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड (Beed), उस्मानाबाद, लातूर (Latur), अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार होत्या.

महत्त्वाच्या बातम्या- 

पत्रकार परिषदेत फडणवीसांनी हळूच कागदावर काहीतरी लिहिलं अन् शिंदेंकडे कागद सरकवला! 

शिंदे-फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा; घेतला मोठा निर्णय 

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने घेतले ‘हे’ मोठे निर्णय; वाचा एका क्लिकवर 

शिंदे सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा; राज्यात मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेल ‘इतक्या’ रूपयांनी स्वस्त 

“…पण फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार नव्हे”