मोठी बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई |  गेल्या वर्षभरापासून कोरोना रोगाने थैमान घातलं आहे. याचा परिणाम अर्थव्यवस्था, आरोग्य त्याचबरोबर शिक्षण पद्धतीवरही झाला आहे. मागिल काही महिन्यांंध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला पाहायला मिळत होता. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे दिवसेंवर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

राज्यातील कोरोनाची संख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसतं आहे. त्यामुळे सरकारने काही निर्बंधही लागू केले आहेत. त्यामधी सोशल डिस्टसिंग पाळणे, मास्क घालणे, इत्यादी नियमांचा समावेश करण्यात आला आहे. तरीदेखील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत नाहीय.

त्यामुळे दहावी-बारावी विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षा तोंडावर आल्या असतानाच कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांमध्येही काळजीचं वातावरण निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं न घेता, त्या ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जाणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा ठरलेल्या तारखेनूसारच होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे करोनाच्या प्रादुर्भाव लक्षात घेऊन परीक्षांच्या वेळेतही बदल करण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांच्या परीक्षेमध्ये केलेले बदल-

  1. दहावी-बारावी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार.
  2. लेखी परीक्षा विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या कॉलेज/शाळेतच घेतली जाणार.
  3. वर्ग खोल्या कमी पडल्यास बाजूच्या शाळा/कॉलेजमध्ये व्यावस्था केली जाईल.
  4. यावर्षी 80 गुणांच्या परिक्षेसाठी 30 मिनिटं वाढून वेळ.
  5. 40 आणि 50 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटं वाढून देण्यात येणार.
  6.  दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येक तासाला 20 मिनिटं वाढवून मिळणार.
  7. प्रॅक्टिक्ल परीक्षा या वर्षी  असाईनमेंट पद्धतीने घेतल्या जाणार.

तसेच एखाद्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नियोजन केले आहे. कोरोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा जून महिन्यात घेण्यात येणार आहे. त्यांची लेखी परिक्षाही शाळेत घेण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

मास्क का घातला नाही? विचारताच महिलेनं केली पालिका…

जाणून घ्या! पुढील चार दिवसात हवामान खात्याकडून…

रितेशच्या ‘त्या’ व्हिडीओ वरून जेनेलियाने केली…

आलियानं लग्नच करू नये अशी महेश भट यांची इच्छा; जाणून घ्या…

मलायका अरोराने सोशल मीडियावर केला ‘हा’ व्हिडीओ…