सुशांत प्रकरणी मोठी बातमी! 13 दिवसांच्या तपासानंतर अखेर सीबीआयचा महत्वाचा निष्कर्ष

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सर्वोच्च न्यायालयानं सुशांत प्रकरण सीबीआयकडं सोपविल्यापासून सीबीआय टीम अतिशय वेगानं तपास करत आहे. गेल्या 13 दिवसांपासून सीबीआय टीम सुशांतप्रकरणाशी जोडलेला प्रत्येक धागा दोरा शोधण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच आता सीबीआयनं सुशांत प्रकरणातील महत्वाचा निष्कर्ष काढला आहे.

सुशांतची  एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, रियाचा भाऊ, रियाचे आई-वडील, सुशांतचा मॅनेजर, सीए, नोकर, वॉचमन, कुपूर रुग्णालयातील डॉक्टर अश्या अनेकांचे जबाब सीबीआयनं नोंदविले आहेत. सुशांतप्रकरणी मुंबई पोलिसांनी दिलेल्या कागदपत्रांचीही सीबीआयनं फेरतपासणी केली आहे. तसेच दिल्लीतील एम्स हॉस्पिटल कडून सुशांतच्या फॉ.रेन्सिक रिपोर्टही मागवण्यात आले होते. या सर्व गोष्टी लक्षात घेत सुशांतनं आत्मह.त्या केल्याचं अखेर सीबीआयनं स्पष्ट केलं आहे.

तब्बल 13 दिवसांच्या तपासानंतर सुशांतची ह.त्या नसून आत्मह.त्या असल्याचं सीबीआयनं स्पष्ट केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून १९ ऑगस्टला सुशांत प्रकरण सीबीआयच्या हाती सोपविण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयानं सुशांत प्रकरण सीबीआयच्या हाती सोपविल्याच्या दुसऱ्याच दिवशी सीबीआय अधिकाऱ्यांची टीम मुंबईत दाखल झाली होती. तेव्हापासून रात्रंदिवस तपास करत सीबीआयनं हा निष्कर्ष काढला आहे.

सुशांतप्रकरणी सीबीआय टीम आता आत्मह.त्येच्या दृष्टीकोनातून तपास करणार आहे. सुशांतच्या आत्मह.त्येमागचं कारण शोधण्याचा सीबीआय आता प्रयत्न करणार आहे. मानसिक छ.ळ, अं.मली पदार्थांचं व्य.सन की आर्थिक अडचण यातील कोणत्या कारणामुळे सुशांतनं आत्मह.त्या केली, हे येत्या दोन दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, रियाच्या व्हाट्सअ‌ॅप चॅटमधून ड्र.ग्ज संबंधित अनेक गोष्टी सीबीआयसमोर आल्या होत्या. रिया व्हाट्सअ‌ॅपवरून अनेकांशी ड्र.ग्जबद्दल बोलली होती. रियाचं व्हाट्सअ‌ॅप चॅट समोर आल्यापासून सुशांत प्रकरणी ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसुद्धा तपास करत होती.

ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं सुशांत प्रकरणी पहिली कारवाई केली आहे. परवेज खान उर्फ चिंकू पठाण हा चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांना गां.जा सप्लाय करत असल्याचा एनसीबीला संशय होता. यामुळे मुंबईत दोन ठिकाणी छापा टाकत चिंकू पठाणला ताब्यात घेतलं आहे. तसेच चिंकू पठाणच रिया चक्रवर्तीलाही ड्र.ग सप्लाय करत असल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

दहावी-बारावीच्या ATKT च्या परीक्षांबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला मोठा निर्णय

…अन्यथा उद्धव ठाकरेंनी काम करण्यासाठी आणखी एक मुख्यमंत्री ठेवावा- चंद्रकांत पाटील

“10- 12 वर्षांपु्वी जन्माला आलेले आता राजकारणात चमकायला लागले असून ते आम्हाला अक्कल शिकवत आहेत”

‘तुम्ही तुमच्या रक्ताचे नमुने ड्र.ग टेस्टसाठी द्या’; बॉलिवूडच्या या बड्या कलाकारांना कंगणाने केलं आवाहन