मोठी बातमी! ‘या’ कारणाने महाविकास आघाडीत शिवसेनेची कोंडी

मुंबई | पूजा चव्हाण आत्मह.त्या प्रकरण सध्या चर्चेमध्ये आहे. हे प्रकरण रोज नवनवीन वळण घेत आहे. तिच्या आत्मह.त्येबद्दल रोज नवीन खुलासे होत आहेत. पोलीसांचा तपास सुरू आहे, मात्र तिच्या आत्मह.त्येशी संबधित अनेक नावे समोर येत आहेत.

या प्रकरणामध्ये शिवसेनेचे नेते व वनमंत्री संजय राठोड यांचा संबध जोडला जात आहे. पूजा प्रकरणामुळे त्यांना आरोप व वा.दांचा सामना करावा लागत आहे. नुकतंच ते वाशिम येथील पोहरादेवी येथे दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या सर्मथकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

या प्रकारानंतर शिवसेना पक्ष व संजय राठोड यांच्यावर चौफेर टीका होत आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्याशिवाय कॉंग्रेसचे जेष्ठ नेते व महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही या गर्दीवर आक्षेप नोंदवला आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील दोन प्रमुख पक्षांनी यावर टिका केल्यामुळे सध्या शिवसेना वा.दाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पोहरादेवी गडावर गर्दी झाल्यामुळे कोरोनाच्या नियमांचे उल्लघंन झाले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

सध्या कोरोना पुन्हा आपले डोके वर काढताना दिसत आहे. प्रशासन कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. अशावेळी एका मंत्र्याने अशी गर्दी जमवणे सरकारसाठी लज्जास्पद आहे, अशी नाराजी शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी सुरु आहे. सत्य लवकरच समोर येईल असं कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्यांच्या सभेला होणाऱ्या गर्दीबद्दल कोणी काही आक्षेप का घेत नाही, असा सवाल देखील नाना पटोेले यांनी केला आहे.

तसेच पोहरादेवी गडावर गर्दी केली गेल्यामुळे संबधितांची लवकरात लवकर चौेकशी करावी व योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नाना पटाेले यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ बड्या अभिनेत्रीचं ठरलेलं लग्न मोडलं, कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल!

राठोड यांच्यावर कारवाई होणार? शिवसेना खासदाराच रोखठोक विधान

गृहिणींचं बजेट कोलमडणार! महिन्यात सलग दुसऱ्यांदा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आयुक्तांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठं स्टेडियम बनवून त्याला स्वत:चं नाव दिलं होतं”