मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कुटुंबीयांकडून चालवण्यात येणाऱ्या युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मीरा-भाईंदर महानगरपालिका आणि अन्य ठिकाणी जवळपास 100 कोटी रुपयांचा ‘टॉयलेट घोटाळा’ करण्यात आल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या या युवा प्रतिष्ठानचा कारभार पाहतात. त्यांनी हा घोटाळा केला आहे. या घोटाळ्याचे पुरावे आणि अहवाल कुठे आहे, हे सोमय्या कुटुंबीयांनाही माहिती आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
किरीट सोमय्या यांचा महाराष्ट्रात दुर्गंध पसरवणारा घोटाळा लवकरच बाहेर येईल. किरीट सोमय्या यांनी ‘आयएनएस विक्रांत’पासून टॉयलेट घोटाळ्यात पैसे खाल्ले आहेत, असा आरोप राऊतांनी केलाय.
100 कोटींच्या टॉयलेट घोटाळ्यात युवा प्रतिष्ठानकडून खोटी बिलं तयार करून पैसे लाटण्यात आले. आगामी काळात आम्ही किरीट सोमय्या यांचे आणखी काही घोटाळे बाहेर काढणार आहोत. त्यामुळे त्यांना आता खुलासेच देत बसावं लागेल, असं संजय राऊत यांनी सांगितलंय.
दरम्यान, किरीट सोमय्या आज दुपारी 1 वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा उघड करणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलंय.
किरीट सोमय्या या पत्रकार परिषदेत कुठला आरोपांचा बॉम्ब फोडतात आणि कुठला घोटाळा बाहेर काढतात याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
ठाकरे सरकारच्या “डर्टी डझन” नेत्यांच्या घोटाळ्यांवर कारवाईचा पाठपुरावा करणार असं म्हणत किरीट सोमय्या हे काही कागदपत्रे घेऊन दिल्लीत दाखल झाले होते. त्यानंतर मुंबई मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाची धाड पडली.
महत्त्वाच्या बातम्या-
“मोदींच्या नावावर मतं मागून शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले”
आलिया-रणबीरच्या फोटोंवर Ex Girlfriend कतरिनाची कमेंट, म्हणाली…
“ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा उघड करणार”
अंडी खात असाल तर ‘ही’ चूक कधीही करू नका; होऊ शकते किडनी खराब
“दुश्मन ना करे दोस्त ने ऐसा काम किया है, जिंदगीभर मुझे बदनाम किया”