पुण्यात मोठं सेक्स रॅकेट उघडकीस; प्रसिद्ध अभिनेत्रीचा सहभाग आढळल्याने खळबळ

पुणे | छत्तीसगडच्या अभिनेत्रीकडून (Chhattisgarh Actress) पिंपरी चिंचवड शहरात वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad Crime) सामाजिक सुरक्षा विभागाने तिघी जणींची देह व्यापाराच्या रॅकेटमधून सुटका केल्याची माहिती समोर आली आहे.

छत्तीसगडच्या अभिनेत्रीकडून पिंपरी चिंचवड शहरात वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळाली.

पोलिसांनी पुणे-मुंबई महामार्गावर ताथवडे येथील साई लॉजवर बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा लावला. त्यानंतर लॉजवर छापा मारुन कारवाई करण्यात आली.

जितेंद्र हस्तीमल बोकाडिया उर्फ हितेश हस्तीमलजी ओसवाल उर्फ महेश उर्फ विकी, हेमंत प्रणाबंधू साहू अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांच्यासह मुकेश केशवाणी, करण, युसूफ उर्फ लंगडा शेख यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी मोबाईलवरुन व्हॉट्सअॅप कॉल करुन वेगवेगळ्या लॉजवर मुली पाठवण्याचं काम करत होते. संबंधित मुली त्यांच्या नावावर हॉटेलमध्ये रूम बुक करत असत.

या दलदलीतून छत्तीसगडच्या अभिनेत्रीसह आणखी दोन महिलांची सुटका करण्यात आली. दोन दलालांना पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

“आरएसएस, रिपाई आपल्यासोबत, मी तुम्हाला विलीनीकरण मिळवून देतो” 

“जसं काय महाराष्ट्र देशातला सगळ्यात सडका भाग आहे, असं….” 

“नरेंद्र मोदींनी समोर येऊन रशिया-युक्रेन युद्ध थांबवावं…” 

“मी पुन्हा येईन यावर अनेकांचा विश्वास नव्हता पण…”

“मी शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडले नाहीत, पण आता…”