मुंबई इंडियन्सला सर्वात मोठा धक्का, ‘या’ स्टार खेळाडूला संघात घेण्यात अपयश

बंगळुरू | आयपीएलच्या 2022 हंगामाचा लिलाव सुरु आहे. राजस्थान रॉयल्सने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टवर सर्वात मोठी 8 कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलंय. बोल्टवर मुंबईने 7.75 कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र राजस्थानने अखेर मुंबईचा खेळाडू आपल्याकडे घेतला.

गेल्या काही मोसमांपासून ट्रेन्ट बोल्ट मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) ताफ्यात होता. बोल्टला पुन्हा टीममध्ये विकत घेण्यासाठी मुंबईने प्रयत्न केला. मात्र त्याला संघात घेण्यात मुंबई इंडियन्सला अपयश आल्याचं दिसतंय.

बोल्ट गेल्या दोन हंगामात मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. त्याने मुंबईसाठी चांगली कामगिरी देखील केली. मात्र हा मेगा लिलाव असल्याने मुंबई इंडियन्सने त्याला आयपीएल 2022 लिलावापूर्वी मुक्त केलं होतं. त्याचमुळे बोल्ट लिलावात सामील झाला होता.

लिलावासाठी 2 कोटी रुपयांची मुळ किंमत असलेल्या ट्रेंट बोल्टसाठी सुरुवातील राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघात चुरस पाहायला मिळाली. पण नंतर मुंबई इंडियन्सने देखील बोल्टमध्ये पसंती दाखवल्याने त्यांनीही त्याच्यावर बोली लावण्यास सुरुवात केली. पण, अखेर राजस्थान संघाने 8 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात त्याला सामील करून घेतलं आहे.

आयपीएल 2020 साली मुंबई इंडियन्स पाचव्यांदा चॅम्पियन बनली होती, तेव्हा ट्रेन्ट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या जोडीने उत्कृष्ट बॉलिंग करत विरोधी टीमच्या बॅटिंगला धक्के दिले होते.

आयपीएलच्या 62 सामन्यांमध्ये बोल्टने 8.4 चा इकोनॉमी रेट आणि 26.09 च्या सरासरीने 76 विकेट घेतल्या आहेत. ट्रेन्ट बोल्ट आयपीएलमध्ये आधी दिल्लीच्या टीमकडे होता, पण दिल्लीने ट्रेडमध्ये ट्रेन्ट बोल्टला मुंबईला देऊन टाकलं.

मुंबईच्या टीममध्ये आल्यानंतर बोल्टच्या कामगिरीमध्ये कमालीची सुधारणा झाल्याचं पाहायला मिळालं. याचा फायदा फक्त बोल्टच नाही तर मुंबई इंडियन्सलाही झाला.

महत्वाच्या बातम्या-

IPL 2022 Auction | शिखर धवनचा पहिला नंबर; तब्बल ‘इतक्या’ कोटींची लागली बोली

‘या’ शेअर्सने गुंतवणूकदार मालामाल; पैसे झाले दुप्पट 

“राजभवानातील नाचणारे मोर हे डसणाऱ्या सापापेक्षा बरे” 

काळजी घ्या! कोरोनामुक्त झालेल्यांना ‘या’ गंभीर आजाराचा धोका; अत्यंत धक्कादायक माहिती समोर 

दहावी, बारावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; लवकर अर्ज करा