सर्वात मोठी राजकीय बातमी, शिवसेना विधिमंडळ कार्यालय सील

मुंबई | शिवसेनेच्या विधिमंडळ कार्यालयातील कर्मचारी रविवारी सकाळपासून कार्यालयाबाहेरच बसून आहेत. शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटातील वादामुळे हे कार्यालयच सील करण्यात आले आहे. त्यामुळे आता शिवसेना आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.

विधीमंडळातील शिवसेनेचे पक्ष कार्यालयाला टाळे लावण्यात आले आहे. शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या आदेशाने कार्यालय बंद ठेवण्यात आल्याची सूचना लिहिण्यात आली आहे. मात्र, ही सूचना कोणी दिली, याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागली आहे.

आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. आज नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. या पदासाठी शिवसेनेचे राजन साळवी आणि भाजपचे राहुल नार्वेकर यांच्यात लढत आहे.

शिवसेनेचे बंडखोर आमदारांनी आम्हीच शिवसेना पक्ष असल्याचा दावा केला आहे. शिवसेना विधीमंडळ पक्ष हा आमचा असून दोन तृतीयांश आमदारांचा आम्हाला पाठिंबा असल्याचा दावा बंडखोर गटाने केला आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेने बंडखोरांवर कारवाईसाठी पावले उचलली आहेत.

शिवसेनेतील अंतर्गत संघर्षाचा परिणाम विधीमंडळातील पक्षाच्या दालनावरही दिसून येत आहे. शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालय यांनी कळवल्यामुळे दालन बंद ठेवण्यात आल्याची सूचना लावण्यात आली आहे. या पक्ष कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही बाहेर काढण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“देवेंद्र फडणवीस हेच बाळासाहेबांचे खरे वारसदार” 

‘शिवसेनेचं व्हिप आम्हाला लागू होत नाही’, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

बंडखोर आमदारांना सोबत घेत मुख्यमंत्री मुंबईसाठी रवाना, राजकीय हालचालींना वेग