“अजित पवारांनी आणि पाटलांनी बाकी पक्षांच्या आमदारांची चिंता नका करू नये, तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा”

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष, सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपण आपल्या नातवाच्या बोलण्याला कवडीची किंमत देत नसल्याचं वक्तव्य केलं होतं. यावरून अनेक राजकीय चर्चा रंगू लागल्या. यावरून विरोधी पक्षानेही राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

भाजपचे नेते आणि माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केला आहे. शेलारांनी आरोप करताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांना एक सल्ला दिला आहे.

अजित पवार आणि जयंत पाटील यांनी आपल्या पक्षात जरी संवाद साधला तरी खूप होईल. अन्य पक्षांच्या आमदारांच्या बाबतीत तुम्ही चिंंता करू नका, तुम्ही स्वत: चा पक्ष आणि सरकार वाचवण्याची भूमिका तुम्ही घ्या, असा सल्ला आशिष शेलार यांनी दिला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वत:च्या घरातील विसंवाद आणि भेद लपवण्यासाठी भाजपचे काही आमदार येतील का?, अशा प्रकारच्या अफवा पसरवण्याचं काम राष्ट्रवादीकडून योजनापुर्वक चालू असल्याचा आरोप शेलांरानी राष्ट्रवादीवर केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

ठाकरे कुटुंबातील व्यक्ती तसं करणार नाही, भाजपने हा वाद सुरू केला; मनसेकडून आदित्य ठाकरेंची पाठराखण

“सुशांतच्या मृत्युवरून पत्रकार परिषद घेणाऱ्या राणेंनी मात्र आपला भाऊ अंकुश राणेंच्या हत्येबाबत ब्रही नाही”

शरद पवार म्हणाले पार्थ इमॅच्युअर, त्यालाच ‘नया है वह’ असं म्हणतात- छगन भुजबळ

…म्हणून किंग कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात ‘आदित्य ठाकरे’!

कोरोना लशीचा परिणाम, सोन्या-चांदीच्या भावात तब्बल ‘इतक्या’ हजाराने घसरण!