चंद्रकांत पाटलांचा उपक्रम; कोथरुडमध्ये 5 रुपयात घरपोच पोळी भाजी

पुणे | लॉकडाऊनच्या कालावधीत जेवणाचा प्रश्न उद्भवलेल्या गरजवंतांसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील धावून आले आहेत.

पुण्यातील कोथरुडचे आमदार असलेल्या चंद्रकांत पाटलांनी आपल्या मतदारसंघात पाच रुपयात घरपोच पोळी भाजी देण्याची घोषणा केली आहे.

जी माणसे धोका पत्करुन हे सर्व पोहोचवणार आहेत, त्यांना विनासायास ये-जा करता यावी, यासाठी आपण प्रशासनाला विनंती केली आहे. आपल्या सगळ्यांचे सहकार्य हवं आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, पोळीभाजीसाठी सकाळी 10 वाजेपर्यंत मागणी करायची आहे. नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर व्हाट्सअप मेसेज करुन मागणी नोंदवावी लागणार आहे. दुपारी एक वाजेपर्यंत पोळीभाजी घरपोच केली जाईल. तसेच संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मागणी केल्यावर रात्री 9 वाजेपर्यंत पोळीभाजी घरपोच मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या – 

-कर्मचारी वर्गाला मोठा दिलासा; मोदी सरकारने केली ही मोठी घोषणा

-बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू मदतीसाठी पुढे सरसावली; केली 5 लाखांची मदत

-“लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी समजला का? जयंतरावांनी मोदींवर केलेली टीका योग्यच”

-सॉरी उद्धवजी… मला तुमची माफी मागायचीय; मुख्यमंत्र्यांकडे अभिनेत्याचा माफीनामा

-गरिबांना तीन महिने गहू, तांदूळ, डाळीचे मोफत वाटप होणार- निर्मला सीतारामन