नेता येण्यापूर्वीच भाजप कार्यकर्त्यांची स्टेजवर तुफान हाणामारी; पहा व्हिडिओ

कोलकत्ता | पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीचं बिगुल वाजलं आहे. पश्चिम बंगाल मधील सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेससहित भाजप नेते निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. अशातच आता भाजपच्या एका प्रचारसभेअगोदर भाजप कार्यकर्त्यांच्यात तूफान हाणामारी झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

पश्चिम बंगाल मधील दुर्गापूर जिल्ह्यात भाजपच्या एका प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रचारसभेसाठी भाजप नेते दिलीप घोष आणि अर्जुन सिंग येणार होते. या सभेसाठी खूप मोठं व्यासपीठ देखील उभारण्यात आलं होतं.

मात्र, नेते येण्याअगोदरच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये व्यासपिठावरंच शाब्दिक बाचाबाची सुरु झाली. पुढे याच बाचाबाचीचे रुपांतर दोन गटांत हाणामारीमध्ये झालं. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये व्यासपीठावरच लाथाबुक्क्यांनी तुफान हाणामारी झाली.

व्यासपीठावरील ही हाणामारी पुढे मोकळ्या मैदानात सुरु झाली. अनेक लोकांनी या हाणामारीचे शूटिंग आपल्या मोबाईलमध्ये केलं आहे. हेच व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

या सभेला येण्यासाठी दिलीप घोष आणि अर्जुन सिंग रवाना झाले होते. मात्र, हे नेते प्रचारसभेच्या ठिकाणी पोहचण्यापूर्वीच भाजप मधील कार्यकर्त्यांच्यात तुफान राडा झाला आहे.

दरम्यान, अमित शहा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असताना पश्चिम बंगालमध्ये खळबळ माजवणारी एक घटना घडली आहे. भाजप समर्थकांना धमकी देणारं एक वाक्य नाडीया मधील भिंतीवर लिहिलेलं आढळलं आहे.

तृणमूल काँग्रेसच्या विरोधात एकही मत दिलं गेलं तर रक्ताचे पाट वाहतील. भाजपला मत दिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा धमकी देणारा मजकूर पश्चिम बंगालमधील नाडीया जिल्ह्यातील एका भिंतीवर लिहिलेला आढळला आहे.

ज्या भागातील भिंतीवर हा मजकूर लिहिला गेला आहे तेथील आमदार तृणमूल काँग्रेसचे अरिंदम भट्टाचार्य हे आहेत. तर खासदार भाजपचे जगन्नाथ सरकार हे आहेत. भिंतीवर हा मजकूर कोणी लिहिला याचा शोध अद्याप लागला नाही. मात्र, या घटनेनं पश्चिम बंगालमध्ये एकंच खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘भाजपला एक जरी मत दिलं तरी रक्ताचे …’; पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं!

“दोन दिवसांपूर्वी महाजन यांनी 25 कोटींची जमीन अवघ्या दीड कोटीत खरेदी केली”

‘कोरोनाची लस घेतल्यास महिलांना दाढी येईल’; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांचं गजब वक्तव्य!

शिवसेनेला मोठा धक्का! ‘हा’ माजी आमदार पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेणार

एका चिमुरड्यानं केलं जयंत पाटलांचं फोटोशूट आणि पाटील म्हणाले…