भाजपच्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलं काँग्रेसच्या पंजाला मतदान करण्याचं आवाहन!

भोपाळ | अलिकडे देशात अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये सध्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. यामुळे सर्वच पक्ष निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी संपूर्ण मेहनतीने प्रयत्न करत आहेत. भाजप आणि काँग्रेस पक्षाचे बडे बडे नेते सध्या बिहार आणि मध्य प्रदेश दौरा करत प्रचारसभा घेत आहेत.

मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या 28 जागांसाठी 3 नोव्हेंबरला मतदान घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक नेते सध्या आपल्या पक्षाचा उमेदवार विजयी करण्यासाठी प्रचारसभा घेत आहेत. भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह हे देखील सध्या मध्य प्रदेशमध्ये जोरदार प्रचारसभा घेत आहेत. अशातच आता ज्योतिरादित्य शिंदे यांचा प्रचारदारम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

भाजपच्या एका उमेद्वाराच्या प्रचारासाठी मध्य प्रदेशमध्ये जाहीर सभा घेण्यात आली होती. या सभेत ज्योतिरादित्य शिंदे यांनी मतदारांना चक्क काँग्रेसच्या पंजाला मतदान करण्याचं आवाहन केलं. हे पाहून स्टेजवर उपस्थित सर्वच भाजप नेते आश्चर्यचकित झाले होते.

मध्य प्रदेश काँग्रेसच्या ऑफिशियल ट्विटर हँडल वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सिंधिया जी, मध्य प्रदेशची जनता तुम्हाल विश्वास देते कि 3 नोव्हेंबरला हाताच्या पंजाचंच बटन दाबलं जाईल, असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे.

भाजप उमेद्वार इमारती देवी यांच्या प्रचारासाठी डबरामध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपचे अनेक बडे नेते उपस्थित होते. याचवेळी ज्योतिरादित्य शिंदे यांनी चुकून काँग्रेसच्या पंजाला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

पंजाला मतदान करण्याचं आवाहन केल्यानंतर काही क्षणातच ज्योतिरादित्य शिंदे यांना त्यांची चूक लक्षात आली. मग त्यांनी लगेच जीभ चावत भारतीय जनता पार्टीच्या कमळाला मतदान करण्याचं आवाहन जनतेला केलं.

शिवराज सिंह आणि आम्हाला डबराच्या जनतेने विश्वास द्या की 3 नोव्हेंबरला हाताच्या पंजाचंच बटन दाबलं जाईल, असं ज्योतिरादित्य शिंदे यांनी डबरा मधील प्रचारसभेदरम्यान म्हटलं आहे. यानंतर चूक लक्षात येताच त्यांनी चूक सावरण्याचा प्रयत्न करत कमळाचं फूल असलेलं बटन दाबणार आणि पंजाला डबरामधून रवाना करणार, असं म्हटलं आहे.

दरम्यान, मध्य प्रदेश कॉंग्रेसने शेअर केलेला हा व्हिडिओ प्रचंड वेगानं व्हायरल होत आहे. अनेक लोक या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

फडणवीस सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला ठाकरे सरकारनं दाखवली केराची टोपली!

सुशांत प्रकरणी चालू झालेल्या ‘त्या’ वादावर अखेर सलमानने मौन सोडलं; शाहरुखचं नाव घेत म्हणाला…

‘या’ बड्या अभिनेत्रीच्या पाठीमागे लागलंय भूत! अभिनेत्रीने स्वतः दिली माहिती

सुनेने केलेल्या गंभीर आरोपांवर मौन सोडत महेश भट्ट म्हणाले…

कंगना आणि प्रियंकाने काम केलेल्या ‘फॅशन’ चित्रपटाविषयी निर्मात्याने उलघडलं ‘ते’ गूढ