कंगना रनौतच्या बहिणीची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका; म्हणाली…

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतची बहिण रंगोली चंडेल सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असल्याचं पहायला मिळते. बऱ्याच वेळा ती सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. पण अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. नुकताच रंगोलीने ट्विट करत महाराष्ट्राचे मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना योगी आदित्यनाथ यांच्याकडून काही शिकण्याची गरज आहे, असं रंगोलीने म्हटलं आहे. तिचे हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आणि तिला पुन्हा सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आलं आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी करोना व्हायरसचा वाढता फैलाव पाहता हॉटेलमध्ये 10,000 खोल्यांमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी हॉस्पिटलमध्ये देखील 10,000 खोल्या करोना रुग्णांच्या उपचारासाठी तयार ठेवल्या आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात अनेक उपाययोजना राबवत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ठाकरेंनी राज्यात अनेक मोठे निर्णय घेतले. शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी अत्यावश्यक सेवेमध्ये शेतीच्या साधनसामग्रीचा समावेश केला.

 

 

 

महत्वाच्या बातम्या-

-महाविकास आघाडीवरचं संकट टळलं; राज्यपालांच्या कोट्यातून उद्धव ठाकरे आमदार होणार

-हा कोरोना पसरवतोय म्हणत तबलिकी जमातच्या एकाला बेदम मारहाण; रूग्णालयात मृत्यू

-मुंबईत कोरोनाबाधितांचा चढताक्रम; महापालिका दक्षिण कोरियाकडून विकत घेणार 1 लाख किट्स

-जितेंद्र आव्हाडांची हकालपट्टी करा; भाजपची राज्यपालांकडे मागणी

-आम्ही ‘मुख्यमंत्र्यांनाच’ उत्तरदायी आहोत – जितेंद्र आव्हाड