बाॅयफ्रेंडनं चोरला गर्लफ्रेंडचा मोबाईल; मग जे काही झालं ते तुम्हीच व्हि़डीओमध्ये बघा…

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक व्हि़डीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ अचंबित करून सोडतात. असा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ही संपूर्ण घटना आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आणि मोबाईलमध्ये कैद झाली आहे. झालं असं की एक तरूणी वाहत्या रस्त्याच्या कडेने जात होती.

त्यावेळी एक तरूण दुचाकीवरून आला. तरूणी रस्त्यावरून जात असताना मोबाईलवर बोलत होती. त्यावेळी तरूण मोबाईल चोरतो आणि तरूणीला ढकलून देतो.

त्यानंतर तरूणी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करते आणि आजूबाजूच्या लोकांना मदतीचं आवाहन करते. त्यावेळी लोकं गाडी काढून चोरट्या तरूणाचा पाठलाग करतात आणि त्याच्या मुसक्या आवळतात.

त्याला दुचाकीवरून घेऊन येतात आणि तरूणीच्या समोर हजर करतात. तोंडावरचा रुमाल काढल्यावर तरूणाचा चेहरा पाहिल्यावर तरूणीला धक्काच बसतो.

दरम्यान, तू याला ओळखते का?, असा सवाल त्याला पकडणारे लोक करतात. त्यावेळी हा माझा बाॅयफ्रेंड असल्याचं तरूणी सांगते. त्यानंतर लोक दोघांना सोडून निघून जातात.

पाहा व्हिडीओ-

महत्त्वाच्या बातम्या- 

कॅप्टन कूल KL Rahul चा धमाका; मुंबई इंडियन्सविरूद्ध दमदार शतक ठोकलं

WHO च्या दाव्याने जगाचं टेन्शन वाढलं; लहान मुलांमध्ये आढळली ‘हिपॅटायटीस’ची प्रकरणे

फायर चंद्रभागा आजींची उद्धव ठाकरेंनी सहकुटूंब घेतली भेट; दिलं ‘हे’ खास गिफ्ट

बँकेची कामं आताच आटोपून घ्या! मे महिन्यात बँका तब्बल 13 दिवस बंद राहणार; पाहा तारखा

“विराटने चौथ्या आणि पाचव्या नंबरवर खेळावं मग…”, माजी खेळाडूचा किंग कोहलीला सल्ला