“प्रिया दत्त यांनी तिकीटं विकण्याचा धंदा केला तर संजय दत्तचा थेट अंडरवर्ल्डशी संबंध”

मुंबई | काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपात दलाली केली. त्यांनी तिकीटं विकण्याचा धंदा केला, असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक ब्रायन मिरांडा यांनी केला आहे. 

ब्रायन मिरांडा यांनी केवळ प्रिया दत्त यांच्यावरच नाही तर त्यांचे भाऊ आणि अभिनेता संजय दत्त याच्यावरही आरोप केले आहे. संजय दत्तचा थेट अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचाही आरोप मिरांडा यांनी लगावला आहे. 

ब्रायन मिरांडा यांनी सोनिया गांधी यांना एक ई-मेल पाठवून आपली बाजू त्यांच्या समोर मांडली आहे. या मेलमध्ये प्रिया दत्त पुन्हा एकदा 175 कलिंगा विधानसभेचं तिकीट विकण्यात यशस्वी झाल्या असल्याचं म्हटलंय.

प्रिया दत्त या काँग्रेसच्या माजी खासदार आहेत. त्यांनी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. मात्र भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी त्यांचा पराभव केला. 

दरम्यान, ब्रायन मिरांडा यांनी केलेल्या आरोपांवर प्रिया दत्त काय उत्तर देतात, हे पाहणं महत्वाचं आहे. 

महत्वाच्या बातम्या-