कौतुकास्पद! पुण्यात हॉटेलमध्ये काम करून रात्रशाळेत शिक्षण घेत ‘तीनं’ मॅट्रीकमध्ये मिळवलं यश!

मुंबई | आज एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल लागला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मात्र पुण्यातील काजल रमेश शिवशरण या विद्यार्थीनीने मोठ्या हालाखीच्या परिस्थितीत दहावीच्या परीक्षेत यश संपादन करत 48 टक्के मिळवले आहेत. तिच्या संघर्षाची कहानी वाचून काजलचा अभिमान वाटेल.

महत्वाचं म्हणजे लहानपणीच बापाची सावली गेली त्यामुळे घरचा कर्तापुरूष गेल्याने घरावर मोठं संकट ओढवलं होतं. त्यामध्ये  काजलची आई पुण्याला आली. मात्र काजलचं शिक्षण आठवीपर्यंतच झालं होतं. त्यानंतर काजलची आई धुण्याभांड्याची काम करून आपला उदरनिर्वाह करू लागले. त्यावेळी काजलनेही लाज न वाटू देता एका हॉटेलमध्ये ती काम करू लागली. मात्र तिची शिक्षणाची इच्छा अधुरीच राहिली होती.

देवाच्या कृपेने काजल ज्या हॉटेलमध्ये काम करत होती त्या हॉटेलच्या मालकीनीला ही गोष्ट समजली. तेव्हा त्या मालकीनीने काजलला मदत केली. काजलने पुण्यात सरस्वती नाईट स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि तिच्या अभ्यासला पुन्हा सुरुवात झाली. दिवसभर काम आणि त्यानंतर शाळेत यायचं, खूप थकवा यायचा पण आपल्याला पुन्हा शिक्षण घेण्याची संधी मिळालेली संधी जाऊ द्यायची नाही, अशी इच्छा मनी बाळगत काजलने संघर्ष केला आणि दहावीची परीक्षा दिली आणि उत्तीर्णही झाली.

दरम्यान, वाणिज्य शाखेतून उच्च शिक्षण घ्यायचं असून मोठं होऊन पोलीस अधिकारी व्हायचं असल्याचं काजलने सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

कौतुकास्पद! पुण्यात हॉटेलमध्ये काम करून रात्रशाळेत शिक्षण घेत ‘तीनं’ मॅट्रीकमध्ये मिळवलं यश!

लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवला, देशात काय सुरू आणि काय बंद?; वाचा एका क्लिकवर

रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर अंकिता लोखंडे म्हणाली…

धक्कादायक! ‘या’ मराठी अभिनेत्रीच्या पतीने गळफास घेत केली आत्महत्या!

महाराष्ट्रातील ऑपरेशन लोटसवर चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…