कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्टेशनवरची गर्दी कमी करण्यासाठी मुंबई रेल्वेने घेतला हा निर्णय

मुंबई | महाभयानक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन राज्य शासन वारंवार करत आहे. मात्र गर्दी काही कमी होताना दिसून येत नाहीये. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने स्टेशनवरची गर्दी टाळण्यासाठी नामी शक्कल लढवली आहे. (Platform Ticket Rate Increase Mumbai Railway)

मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर वाढवले आहेत. 10 रूपयावरून हे दर रेल्वेने 50 रूपये केले आहेत. यामुळे तरी आता प्लॅटफॉर्मवरची किंवा स्टेशनवरची गर्दी कमी होईल, अशी आशा रेल्वे प्रशासन करत आहेत. (Platform Ticket Rate Increase Mumbai Railway)

बहुतांशी खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व सरकारी कार्यालये 7 दिवस बंद ठेवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, येणाऱ्या काही दिवसांत अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी लोकांनी देखील अधिक जागरूक राहणं गरजेचं आहे. गरज नसेल त घराबाहेर पडू नये हे आपण स्वत:हून एक जबाबदार नागरिक म्हणून ठरवलं पाहिजे.

 

महत्वाच्या बातम्या –

-सर्व शासकीय कार्यालये 7 दिवस बंद; सरकारचा मोठा निर्णय

-राफेल घोटाळा झाकण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांचीच राज्यसभेवर नियुक्ती; काँग्रेसची टीका

-महेश भट्टांनी कोरोनाच्या जनजागृतीसाठी शेअर केली “ही” कविता

-“जर 7 दिवसांसाठी लोकल ट्रेन बंद राहिल्या तर लाखो लोकांना कोरोनाच्या संसर्गापासून रोखण्यात मदत होईल.”

-प्रवाशांनी कोरोनामुळं फिरवली सार्वजनिक वाहतूकीकडे पाठ