भाजपवाल्यांनो, तुम्ही करा मिशन कमळ आमच्याकडे ‘धनुष्यबाण’ आहे- छगन भुजबळ

मुंबई | राज्यात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सत्तासमीकरणांमध्ये अमुलाग्र बदल झाला. भाजपच्या एकेकाळच्या मित्राने म्हणजे शिवसेनेने काडीमोड घेत काँग्रेस राष्ट्रवादीशी सलगी केली. या सगळ्यांमुळे 105 आमदार असूनही भाजप बॅकफूटला गेल्याचं चित्र आहे. यामुळे भाजप राज्यात मिशन लोटस राबवून महाराष्ट्रात पुन्हा सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. यावरच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला टोला लगावला आहे.

भाजपवाल्यांनो, तुम्ही करा मिशन कमळ.. आमच्याकडे मजबुत ‘हात’ आहेत. हातात ‘धनुष्यबाण’ आहे आणि किती वेळात बाण खेचायचा यासाठी ‘घड्याळ’सुद्धा आहे, अशी मिश्किट टिप्पणी करत भुजबळांनी भाजपला टोला लगावलाय.

दुसरीकडे आम्हाला राज्यात कुठलंही मिशन करण्याची गरज नाही. हे तीन चाकी रिक्षाचं सरकार लवकरच पडणार आहे. हे सरकार त्यांच्या मरणाने मरेल, अशी टीका माजी मंत्री आणि भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी केली आहे.

दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत केंद्रिय अर्थमंत्री म्हणून जाण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. केंद्रात अनुभवी आणि अभ्यासू नेत्यांची कमी जाणवत असल्याने फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. तर फडणवीस दिल्लीत जाण्याने महाराष्ट्राला फायदाच होईल, अशा प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-शिवसेनेने माझ्या आमदारकीचा राजीनामा घेतला, तर मी शिपाई म्हणून काम करेन- तानाजी सावंत

-शाहीन बाग आंदोलनादरम्यान फुलल्या प्रेमाच्या कळ्या; दोन जोड्या करतायत लग्न

-शाहीन बाग आंदोलनादरम्यान फुलल्या प्रेमाच्या कळ्या; दोन जोड्या करतायत लग्न

-बॅकफूटला गेलेल्या भाजपला अखेर गुड न्यूज!

-मुंबई भाजपमध्ये अध्यक्ष हटवण्याच्या जोरदार हालचाली; या नेत्यांची नावे चर्चेत