येत्या पाच दिवसांत ‘या’ भागांत जोरदार पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज

मुंबई | राज्यात सध्या उन्हाचा तडाखा पहायला मिळत आहे. उष्णतेच्या लाटेनं शरिराची लाही लाही होत आहे.

तापमानाचा पारा हा सातत्याने वाढताना दिसत असून एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक भागांत तापामानाने उच्चांक गाठला . वाढत्या तापमानामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिउष्णतेचा तडाखा सुरूच आहे. मात्र असं असतानाही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही.

राज्यात येत्या पाच दिवसांमध्ये तीव्र हवामान सक्रीय राहील, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पहाटेपासूनच विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. यामुळे वातावरणात गारवा आला आहे.

येत्या पाच दिवसांत राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रा लगतच्या मराठवाड्याच्या भागांत गडगडाटासह वादळी वारे, पावसाची शक्यता आहे.

सातारा, सांगली, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सोमवार ते गुरुवार, कोल्हापूरमध्ये बुधवारपर्यंत, नांदेडमध्ये बुधवार आणि गुरुवारी तर बीड-परभणीमध्ये गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “भाजप नाच्या पोरांसारखा त्या बाईच्या इशाऱ्यावर नाचतो, हे….”

  Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा काय आहेत दर

  मोठी बातमी ! भायखळा तुरुंगात रवानगी होताच नवनीत राणा यांची प्रकृती खालावली

बाॅयफ्रेंडनं चोरला गर्लफ्रेंडचा मोबाईल; मग जे काही झालं ते तुम्हीच व्हि़डीओमध्ये बघा…

कॅप्टन कूल KL Rahul चा धमाका; मुंबई इंडियन्सविरूद्ध दमदार शतक ठोकलं