मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी खंडणीचे गंभीर आरोप करण्यात आले होते. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले होते. यामुळे अनिल देशमुखांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
परमबीर सिंह यांचे आरोप खोटे आहेत, असा अहवाल चांदीवाल आयोगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित होते.
परमबीर सिंहांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवत गंभीर आरोप केले होते. सदर पत्रातील आरोपांची चौकशी करण्याकरिता राज्य सरकारने न्यायमुर्ती चांदीवाल यांचा एक सदस्य आयोग नेमला होता.
अनेक महिने चौकशी आणि अनेक जबाब नोंदवल्यानंतर चांदिवाल आयोगाने या प्रकरणी अनिल देशमुखांवर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आहे.
परमबीर सिंह यांनी मुंबईमधील 1750 बार आणि रेस्टॉरंटमधून प्रत्येक महिन्याला 100 कोटी वसूलीचे आदेश अनिल देशमुखांनी दिल्याचा आरोप केला होता.
परमबीर सिंह यांनी खळबळजनक आरोप केल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. मुकेश अंबानींच्या घराजवळ स्फोटकांची गाडी सापडल्यापासून हे प्रकरण अनिल देशमुखांच्या अटकेपर्यंत गेले होते.
मनसुख हिरेन हत्याप्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझेला अटक करण्यात आली होती. सचिन वाझेच्या पोलीस दलातील समावेशावरून अनेक सवाल उपस्थित करण्यात आले होते.
दरम्यान, नैतिकता म्हणून अनिल देशमुखांची गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. अशातच आता चांदीवाल आयोगाने सर्व आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे अनिल देशमुखांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘साहेबांसमोर सांगतोय, मला विक्रम काळेंची भीती वाटते’; अजित पवारांची जोरदार फटकेबाजी
नवनीत राणांच्या आरोपावर मुंबई पोलिसांचं प्रत्युत्तर; CCTV व्हिडीओ शेअर करत म्हणाले…
चोरट्यांचा नाद खुळा! थेट बुलडोझरने फोडलं ATMचं मशीन; पाहा व्हिडीओ
भर मांडवात नवरा बायकोची हाणामारी; व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
‘….हे सुद्धा मुख्यमंत्र्याला कळत नाही’; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका