“उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मुलाला मुख्यमंत्री बनवण्याच्या महत्वाकांक्षेसाठी या जनादेशाचा अनादर केला”

नवी मुंबई | शिवसेनेनं सत्तेसाठी सगळी तत्वं गुंडाळून मातोश्रीच्या एका कोपऱ्यात ठेवली आहेत. हे सरकार महाराष्ट्राच्या जनतेची घोर फसवणूक करत आहे, अशी घणाघाती टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

नवी मुंबईत भाजप प्रदेश राज्य परिषद आयोजित करण्यात आली आहे. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करेल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं महायुतीला सत्ता स्थापनेसाठी स्पष्ट जनादेश दिला होता. मात्र स्वत:च्या मुलाला मुख्यमंत्री बनवण्याच्या महत्वाकांक्षेसाठी या जनादेशाचा अनादर शिवसेनेनं केला, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.

दरम्यान, सत्तेसाठी शिवसेनेनं हिंदुत्वाच्या तत्वाला मूठमाती दिली. सत्तेपायी महापुरूषांचा अपमानही शिवसेना आज सहन करत आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-चांगलं काम करुनही एवढा त्रास सहन करावा लागतोय; इंदुरीकरांची पुन्हा उद्वीग्न प्रतिक्रिया

-…म्हणून आज तुम्हाला घरी बसावं लागलं- अजित पवार

-लोकांना मोफत योजना घेण्याची सवय लावू नका- अजित पवार

-महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष टिकणारच!; शरद पवारांना विश्वास

-तू राजकारणात आलीस. तुझा भाऊ का नाही?; पूनम महाजन म्हणतात…