सरकारने मास्क आणि हॅन्ड वॉश रेशन दुकानातून द्यावेत; चंद्रकांत पाटलांची मागणी

मुंबई | कोरोनचा वाढता प्रभाव यापासून बचावासाठी सर्वसामान्य नागरिकांना मास्क आणि हॅन्ड वॉश हे रेशन दुकानातून अल्प दरात उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

पुण्यात कोरोना रोगाचे पाच संशयित रुग्ण आढळले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनापासून बचावासाठी औषध विक्री दुकानातून तोंडाला लावण्यासाठीचे मास्क अव्वाच्या सव्वा दराने विकले जात आहेत. हे सर्वसामान्य लोकांना परवाडण्याजोगे नाही त्यामुळे सरकारने मास्क आणि हॅन्ड वॉश रेशन दुकानातून द्यावेत, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

विधानसभेत कोरोनावर चर्चा सुरु होती. यावेळी त्यांनी मास्क आणि हॅन्ड वॉश हे रेशन दुकानातून उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.

दरम्यान, कोरोना महाराष्ट्रातही धडकला आहे. महाराष्ट्रात कालपर्यंत कोरोना बाधितांच्या संख्या पाच होती. मात्र या संख्येत आज वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या 10 वर पोहोचली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…तर बाबरीनंतर दंगली उसळल्या नसत्या; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

-महाराष्ट्रात कोरोनाचे 10 रूग्ण; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषदेत माहिती

-ज्योतिरादित्य शिंदेनी भाजपप्रवेश करताच राजेंच खास ट्वीट

-भाजपने या दोन नेत्यांची तिकीट कापली… तर या दोन नेत्यांना लागली लॉटरी!

-उदयनराजेंचं राजकीय भविष्य भाजपने ठरवलं; घेतला हा मोठा निर्णय…