खडसेंनी पक्ष सोडू नये म्हणून भाजपचा आटापिटा, ‘हे’ नेते पोहोचले भेटीला!

जळगाव | भाजपमधील नाराज नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं दिसतंय. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षावर नाराज आहेत. त्यांनी पक्ष सोडू नये म्हणून भाजपकडून मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

भाजपच्या विभागीय कोअर कमिटीच्या बैठकीच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे नेते गिरीश महाजन हे नेते त्यांच्या भेटीला जळगावात पोहचले आहेत. पण खडसे बैठकीला उशीरा पोहचल्याची माहिती आहे.

पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पक्षातील नेत्यांनीच पाडलं, असा आरोप एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यांना डावलून लेकीला उमेदवारी दिली आणि रोहिणी खडसे यांचा पराभवामुळे खडसे नाराज असल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, पक्षांतर्गत वाद झाला तर ते बाहेर फुटू नयेत म्हणून बंद दाराआड चर्चा करण्यात आली. आता भाजपला एकनाथ खडसेंचं मन वळवण्यात यश येतंय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-