“ज्यांची चौकशी करायचीये त्यांची लवकर करा… तुमचं सरकार कमी काळाचं आहे”

कोल्हापूर |  कोरेगाव भीमा हिंसाचाराप्रकरणी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची चौकशी करा, अशी मागणी कर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि याचिकाकर्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी केली आहे. या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाकडे त्यांनी तशी इन्टरवेन्शन याचिका दाखल केली आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

कोरेगाव भीमा प्रकरणात कुणाचीही चौकशी करा…. आम्ही नाही घाबरत चौकशीला….. तुमचं सरकार कमी काळाचं आहे… त्यामुळे ज्या काही चौकशा करायच्या आहेत त्या लवकर करा… लवकर आटपून घ्या, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

घटना ही बाबासाहेबांनी अश्याप्रकारे लिहीली की पुढची शेकडो वर्ष ती चालेल. त्यामध्ये केंद्र आणि राज्य संबंध कसे असले पाहिजे.. केंद्राचे अधिकार कोणते…. राज्याचे अधिकार कोणते हे सगळं त्यात लिहिलं आहे. महाराष्ट्रामध्ये जर केंद्राची चौकशी समिती अली तर त्याला आम्ही सहकार्य करणार नाही. म्हणजे देशाचं विघटन करण्याचा प्रयत्न चाललाय काय? केंद्र नावाची काही रचना नाही का? केंद्राच्या चौकशी पथकाला सहकार्य करावंच लागेल, अशी भूमिका त्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर मांडली.

दरम्यान, भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास केंद्र सरकारकडून एनआयएकडे देण्यात आल्यापासून राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.  मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी केंद्राच्या या निर्णयावर सडकून टीका केली.

महत्त्वाच्या बातम्या-

-नवाब मलिकांचं मुनगंटीवारांना खुलं आव्हान!

-तो व्हिडीओ पाहून रितेश हळहळला; नेटकऱ्यांकडे मागितला व्यक्तिचा फोन नंबर!

-भीमा कोरेगाव प्रकरणी भाजप-राष्ट्रवादीत जोरदार सामना; फडणवीस म्हणतात…

-‘या’ मराठी अभिनेत्याला शरद पवार यांची भूमिका साकारायचीये!

-“कोरेगाव भीमा प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची चौकशी करा”