एकनाथ खडसेंना द्यायला शिवसेनेकडं काय आहे तरी काय?; चंद्रकांत पाटलांचा सेनेला टोला

पुणे | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे शिवसेनेच्या संपर्कात असून ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा  सुरू होत्या. यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना काही अर्थ नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

खडसेंची केंद्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा आणि माझ्याशी भेट झाली. त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले आहेत. तसेच एकनाथ खडसेंना द्यायला शिवसेनेकडे आहे तरी काय? अशी बोचरी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.

कोल्हापूरमध्ये शिवसेना विरोधकांना जाऊन मिळाली म्हणून भाजपला अपयश आलं. आम्हाला हरवण्यासाठी सर्वांना एकत्र यावं लागलं. सोलापूर, सांगलीत आम्ही आलो हे लक्षात असू द्या, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सरकारने सत्तेसाठी नीतीमुल्ये सोडली आहेत. जनतेच्या प्रश्नांचं त्यांना काही पडलं नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या-