कोरोनाचा संकट जाईपर्यंत शिवभोजन थाळी 5 रूपयांना; मंत्री छगन भुजबळांची घोषणा

नाशिक |  कोरोनाचा संकट जाईपर्यंत शिवभोजन थाळी अवघ्या 5 रूपयांत देण्यात येईल, अशी घोषणा राज्य शासनाच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. रोज 11 ते 3 या वेळेत ही थाळी आता 10 रुपयांऐवजी 5 रुपयांना मिळेल, असं त्यांनी सांगितलं आहे. तसंच स्वस्त धान्य दुकानात 2 महिन्याचे अधिकचे धान्य उपलब्ध आहे. 6 महिने पुरेल एवढे अन्न धान्य आपल्याकडे उपलब्ध असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

शिवभोजन थाळीचा विस्तार करण्यात आला आहे. आजपासून याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. रोज एक लाख लोकांना ही थाळी देण्यात येईल पुढील तीन महिने ही सवलत देण्यात आली असून यासाठी 160 कोटींचा कार्यक्रम आखला आहे, असं त्यांनी सांगितलं.

कोरोनामुळे ज्यांना अन्न मिळत नाही, बेघर आहेत त्यांना शिवभोजनमध्ये जेवण मिळणार आहे. कोरोनामुळे अनेक जणांचा रोजगार गेला आहे. तेव्हा त्यांच्यापुढे भूकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा सगळ्यांना फक्त 5 रूपयांत मिळणाऱ्या शिवभोजन थाळीमुळे दिलासा मिळणार आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान शिवभोजन थाळी केंद्रात रोज निर्जंतुकीकरण केले जाईल. शिवभोजन थाळी केंद्रातील कर्मचाऱ्यांनी मास्क वापरावे. मास्क आणि सॅनेटायझर आता अत्यावश्यक सेवेत आणले आहेत. सर्वसामान्य व्यक्ती, कामगार, मजूर, उद्योगधंदे, अर्थव्यवस्था, सरकार या सगळ्यांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. मात्र,आता कोरोना सोबतची लढाई जिंकणं सगळ्यात महत्वाचं आहे, असं भुजबळ म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

-चांगली बातमी! या दोन देशांनी कोरोनावर शोधली लस

-लॉकडाऊनसारख्या कठोर निर्णयांबाबत देशाची माफी मागतो- पंतप्रधान

-रैना झाला सर्वात मोठा दिलदार! सर्वात जास्त रक्कम कोरोना बाधीतांसाठी दान

-कोरोनामुळे ‘गोकुळ’ तोट्यात; घेतला ‘हा’ निर्णय

-“मुस्लीम बांधवांनी सामुदायिक नमाजचा अट्टाहास टाळावा”